Home > रिपोर्ट > मुख्यमंत्र्यांनी भाजपमध्ये येण्यासाठी पैशांची ऑफर दिली – यशोमती ठाकूर

मुख्यमंत्र्यांनी भाजपमध्ये येण्यासाठी पैशांची ऑफर दिली – यशोमती ठाकूर

मुख्यमंत्र्यांनी भाजपमध्ये येण्यासाठी पैशांची ऑफर दिली – यशोमती ठाकूर
X

भाजपमध्ये येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला बोलावून पैशाची ऑफर दिली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केलाय. अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा इथं पुरोगामी महाआघाडीच्या लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. ‘परवा मुख्यमंत्र्यांनी मला बोलावून पैशाची ऑफर दिली होती आणि भाजपमध्ये सामील होण्याबाबत सांगितलं’’, असं आमदार ठाकूर म्हणाल्या. मात्र, आम्ही विचारधारेवर चालणारे लोकं आहोत. त्यामुळं माझ्यासाठी महत्त्वाचे नाहीत तर विचार महत्त्वाचा असल्याचं यावेळी त्या म्हणाल्या. दरम्यान, विनोद तावडे यांनी यशोमती ठाकूर धादांत खोटं बोलत आहे असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. पाहा काय म्हणाले तावडे ...

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2221621991488214/

Updated : 3 April 2019 11:43 AM GMT
Next Story
Share it
Top