Home > रिपोर्ट > राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून; महिला अत्याचारावर विरोधक घेरणार?

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून; महिला अत्याचारावर विरोधक घेरणार?

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून; महिला अत्याचारावर विरोधक घेरणार?
X

राज्य सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. महाविकास आघाडीचं हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. शेतकरी कर्जमाफी, महिला अत्याचार या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची रणनिती भाजपने आखली आहे.

तर दुसरीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे विरोधकांची अडचण होण्याची शक्यता आहे. काल रात्री महाविकास आघाडीच्या पक्षांच्या समन्वय समितीची बैठक झाली. यात विरोधकांना कसं प्रत्युत्तर द्यायचं यावर चर्चा झाली.

Updated : 24 Feb 2020 5:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top