बेरोजगारी दूर करण्यासाठी आदिती तटकरे यांचा मोठा निर्णय...
X
देशातील वाढत्या बेरोजगारीला उद्योग धंदे उभे करणे. हाच एक उपाय आहे. हा विचार डोळ्यासमोर ठेवून उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी सोलापूर जिल्ह्यातील मौजे मोडनिंब, करमाळा, केम व माढा या ठिकाणी नव्याने एमआयडीसी निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी मौजे मोडनिंब व माढा येथे एमआयडीसी निर्माण करण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करा, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले आहेत.
औद्योगिक क्षेत्रासाठी पाणीपुरवठा तसेच इन्फ्रास्ट्रक्चर रेट गृहित धरून याबाबत प्रस्ताव शासनास सादर करावा, असंही यावेळी तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.
यावेळी आमदार बबनराव शिंदे, संजय शिंदे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, उपअभियंता सुनिल चि. कोलप,भूसंपादनचे महाव्यवस्थापक गोपीनाथ ठोंबरे आदी उपस्थित होते.