Home > रिपोर्ट > सिल्व्हीया एर्ले...

सिल्व्हीया एर्ले...

सिल्व्हीया एर्ले...
X

अगदी बोलताबोलता सहज आपण म्हणून जातो की ‘दिवसें दिवसे हवामान किती बदलतय ना’ हे बोलणे सहज असले तरी खरे आहे. जगभर वारंवार विध्वंस करणारी वादळं, पूर, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीत वाढ होताना दिसते आहे. या समस्यांना सातत्याने आपणाला तोंड द्यावे लागते आहे. ही समस्या वेळीच ओळखून यावर उपाय योजना करण्यासाठी जगातल्या २७ स्त्रीया उभारल्या आहेत. यातलीच एक आहे सिलव्हिया एर्ले. ‍

सिलव्हिया एर्लेचा जन्म १९३५ साली न्यु जर्सी येथे झाला. सिलव्हियाच्या घरातील सर्वांच्याच ‘निसर्ग’ हा आवडीचा विषय होता. निसर्गावर प्रेम करा हा मुलमंत्र तिच्या आईवडिलांनी मुलांना नुसता शिकवला नाही तर त्यासाठी त्यांना प्रोत्सहन पण दिले. काही काळानंतर त्यांचे कुटुंब पश्चिम फ्लोरिडाला स्थलांतरित झाले. या शहराला समुद्र किनारा लाभला होता. सिलव्हियाला या समुद्र किनाऱ्यावर मनसोक्त भटकायला खूप आवडायचे. समुद्र हा तिच्या जिव्हाळ्याचा विषय होता. पुढे जाऊन याआवडीचे रूपांतर तिच्या करिअर मध्ये झाले. तिने ‘मरिन सायंटिस्ट’ होण्याचा निश्चय केला. ड्यूक विद्यापीठातून डॉक्टररेट मिळवल्यानंतर ती हारवर्ड विद्यापीठात रिसर्च फेलो म्हणून दाखल झाली. याठिकाणी प्रोजेक्ट ‘टेकटाईट’मध्ये मुख्य शास्त्रज्ञ म्हणून तिने भूमिका पार पाडली. समुद्री जीवांचा तिने या विद्यापीठात खूप अभ्यास केला.

१९८२ साली तिचे पती ग्रॅहम हॉव्क्स यांनी खोल समुद्रातील संशोधन करण्यासाठी एक पाणबुडी तयार केली. ही पाणबुडी समुद्राच्या खाली ३,३०० इतकी खोल जाऊ शकत होती. पतीच्या या कामात सिलव्हियाने मदत करायला सुरूवात केली. या पाणबुडीच्या सहाय्याने खोल समुद्रातील पर्यावरण अभ्यासणे त्यामुळे सोपे जाऊ लागले. पुढे तिने ‘डिप ओसिन एक्सप्लोरेशन ॲड रिसर्च’ नावाची संस्था सुरू केली. याचबरोबर समुद्री पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्या अनेक संस्थासाठी ती काम करू लागली.

‘मिशन ब्लू’ हा तिने हाती घेतलेला एक महत्वाचा कार्यक्रम. समुद्रांचे संरक्षण, संशोधन करणे हा यामागचा हेतू हाता. समुद्र म्हणजे पृथ्वीचे निळे ऱ्हदय आहे. याची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे. हा विचार पुढे घेऊन लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी या मिशन ब्लूची टिम काम करत आहे. सोशल मिडीया, पारंपारिक माध्यमे आणि नवनव्या कल्पनांचा वापर करून लोकांमध्ये जागृती करण्याचे काम या मिशनव्दारे केले जात आहे. आजवर २०० हून आधिक संस्थानी, एनजीओनी तिच्या या कार्यक्रमाला साहाय्य केले आहे. २०१४ ला नेटफ्लिक्स या इंटरनेट वाहिनीने सिलव्हियाच्या या कामाची ‘मिशन ब्लू’ नावाची एक डॉक्युमेंटरी तयार केली आहे.

ऐंशी वर्षाची सिलव्हिया अजूनही या प्रोजेक्टवर काम करते आहे. विविध विद्यापीठांनी तिला डॉक्टरेट पदवी देऊन तिचा सन्मान केला आहे.आयुष्यभर तिने केलेल्या कामाबद्दल रॅचेल कार्सन, लेवीस थॉमसन अवॉर्ड अशा अनेक पुरस्कारांनी तिला सन्मानित केले आहे. जग बदलू पहाणारी सिलव्हिया टाईम मासिकाच्या मुखपृष्ठावरही ती झळकली आहे. समुद्र जितका प्रचंड असतो तितकेच ती करत असलेले काम ही प्रचंड आणि सन्मानीय आहे.

-वर्षा सपकाल

Updated : 1 Aug 2019 10:06 AM GMT
Next Story
Share it
Top