Home > रिपोर्ट > राहुलजी, मर्यादा राखून बोला- सुषमा स्वराज

राहुलजी, मर्यादा राखून बोला- सुषमा स्वराज

राहुलजी, मर्यादा राखून बोला- सुषमा स्वराज
X

निवडणुकांचा हंगाम सुरु आहे एकमेंकांविरोधात टिका-टिप्पणी सुरु असल्याचे चित्र सध्या देशभरात पाहायला मिळतेय... सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरुच असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मर्यादा सांभाळून शब्दांचा वापर करा अशी संतप्त प्रतिक्रिया ट्विट करुन दिली आहे.

का भडकल्या सुषमा स्वराज?

राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात घेतलेल्या सभेत पंतप्रधान मोदींवर टीका करताना अडवाणींचा उल्लेख केला. त्यावर सुषमा स्वराज यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

सध्याच्या भाजपमध्ये ज्येष्ठ नेत्यांचा आदर केला जात नाही. मोदी आणि अडवाणींचे नाते गुरु शिष्याचे आहे. मात्र, मोदींनी त्यांना डावलले. गुरू समोर आल्यानंतर साधे हातही जोडत नाहीत. त्यांनी आपल्या गुरूला बूटांनी मारून स्टेजवरून खाली फेकलं आहे,' असा टोला राहुल गांधी यांनी लगावला होता त्यावर सुषमा स्वराज यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

'अडवाणी हे आम्हाला पितृतुल्य आहेत. त्यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळं आम्हाला वेदना झाल्या आहेत. त्यांनी भाषेचा वापर करताना मर्यादा पाळाव्यात असं सुषमा स्वराज यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

https://twitter.com/SushmaSwaraj/status/1114381351048716289

Updated : 6 April 2019 7:54 AM GMT
Next Story
Share it
Top