Home > रिपोर्ट > द्रौपदीचे वस्त्रहरण सुरु असताना मुलायम भाई भीष्मासारखे मौन राहू नका- सुषमा स्वराज

द्रौपदीचे वस्त्रहरण सुरु असताना मुलायम भाई भीष्मासारखे मौन राहू नका- सुषमा स्वराज

द्रौपदीचे वस्त्रहरण सुरु असताना मुलायम भाई भीष्मासारखे मौन राहू नका- सुषमा स्वराज
X

निवडणुकांच्या काळात महिला उमेदवारांवर खालच्या पातळीची टीका नेहमीच होत असते मात्र आता हे चालणार नाही यावर कडक कारवाई झाली पाहिजे. नुकतेच

रामपूरमधील भाजपा उमेदवार जया प्रदा यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्या आझम खान यांचा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. सुषमा स्वराज यांनी टि्वट करुन मुलायम सिंह यादव यांना भीष्माप्रमाणे मौन रहाण्याची चूक करु नका असे सांगितले आहे.

मुलायम भाई तुम्ही समाजवादी पार्टीचे पितामह आहात. तुमच्यासमोर रामपूरमध्ये द्रौपदीचे वस्त्रहरण होत आहे. तुम्ही भीष्माप्रमाणे मौन रहाण्याची चूक करु नका असे सुषमा स्वराज यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. सुषमा स्वराज यांनी आपल्या टि्वटमध्ये समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव, त्यांच्या पत्नी डिंपल यादव आणि जया बच्चन या महिला नेत्यांनाही टॅग केले आहे.

काल रामपूर येथील सभेत आझम खान यांनी भाषण करताना मर्यादा सोडून अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरली. जाहीर सभेमध्ये आझम खान यांनी जयाप्रदा यांच्याबद्दल अश्लील टिप्पणी केली. राष्ट्रीय महिला आयोगानेही आझम खान यांच्या वक्तव्याची दखल घेतली असून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे.

https://twitter.com/SushmaSwaraj/status/1117619108621586432

Updated : 15 April 2019 1:40 PM IST
Next Story
Share it
Top