जेव्हा सुप्रिया सुळे अजित पवारांचा सत्कार करतात...
X
शेतीला तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी नव्या कृषी संस्कतीचं 'कृषिक-२०२०' प्रात्यक्षिकयुक्त कृषी प्रदर्शन आजपासून माळेगाव येथे सुरु होत आहे. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, कृषी मंत्री दादा भूसे, दुग्ध व पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, मंत्री विश्वजीत कदम यासह डॅन अलुफ व राज्यातील बहुतांशी विद्यापीठांचे कुलगुरू, शास्त्रज्ञ उपस्थित उपस्थित आहेत.
हे कृषी प्रदर्शन 16 जानेवारी ते 19 जानेवारी पर्यंत चालणार आहे. या प्रदर्शनात सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्कार केला. त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा सत्कार केला. मात्र, ज्यावेळेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार सुप्रिया सुळे करतील अशी घोषणा करण्यात आली तेव्हा अजित पवार आणि सुप्रिया सुळे दोघंही अचंबित झाले. आणि अजित पवार यांनी हसत सुप्रिया सुळे यांच्याकडून सत्कार स्वीकारला.