Home > रिपोर्ट > सुप्रिया सुळेंनी केलं बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन

सुप्रिया सुळेंनी केलं बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन

सुप्रिया सुळेंनी केलं बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन
X

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज ७वा स्मृतीदिन आहे. यानिमित्त सर्वच पक्षाच्या नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहीली आहे. बाळासाहेब ठाकरे आणि पावाराचे राजकारणापलिकडे आपूलकीचे संबंध आहेत. सकाळीच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना बाळासाहेबांना आदरांजली देऊन म्हटल की, “प्रादेशिक अस्मितेचा हुंकार स्वाभिमानाने मिरवणारा मराठी माणूस बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केला.” त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात आपुलकीच स्थान निर्मान केल. लोकांच्या हितासाठी, गरीबांच्या रोजगारासाठी आणि व्यवसायासाठी सातत्याने प्रयत्न केले. हिंदुत्ववादी बाणा कायम ठेवून त्यांनी अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरले. त्यांनी केलेले कामांमुळे आजही ते लोकांच्या मनात जिवंत आहेत. आजही अनेक नेत्यांचे ते आदर्श आहेत. त्यामुळे त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त अनेक नेत्यांनी शिवतिर्थावर जाऊन त्यांना आदरांजली दिली. तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांचे विनम्र अभिवादन केले आहे.

Updated : 17 Nov 2019 2:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top