Home > रिपोर्ट > नडायचं असेल तर अमित शाहांना, बाकीचे मंत्री तर आमच्याकडे रडतात- सुप्रिया सुळे

नडायचं असेल तर अमित शाहांना, बाकीचे मंत्री तर आमच्याकडे रडतात- सुप्रिया सुळे

नडायचं असेल तर अमित शाहांना, बाकीचे मंत्री तर आमच्याकडे रडतात- सुप्रिया सुळे
X

नडायचं असेल तर अमित शाहांना (Amit Shah) नडायचं बाकीच्या मंत्र्यांना कशाला खिजगणतीत घ्यायचं असा घणाघाती टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना लगावला आहे. विधानसभा अधिवेशनात सभागृहातील चर्चेदरम्यान फडणवीस यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. यावर “मी पण गेली १० वर्ष खासदार आहे. एखादा भाजपचा जरी नवीन मंत्री असला तर मी नाही त्याला नडत. कशासाठी नडू, अरे नडायचंच आहे तर आपल्यापेक्षा ताकदवराशी लढा. आपल्यापेक्षा लहान मुलांबरोबर नडण्य़ात काय गंमत.” असा टोला लगावला. धुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत त्या बोलत होत्या.

आदित्य ठाकरे सभागृहात आपल्या खात्यासंबंधित उत्तर देत असताना माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना प्रतिप्रश्न विचारुन अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांच्या भुमिकेवर खेद व्यक्त केला आहे.

“एकदा निवडून आलेला एखादा नवीन मुलगा काही तरी करु बघतो तर आपण त्याला कधी आडवं लावणार नाही. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता. एक युवा काहीतरी करायला बघतोय, तर उगाच काहीतरी एशियन बॅंकचं काय करणार? ज्याचा काहीही संबंध नसतो, असे प्रश्न विचारले जातात.” अशी टीका सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली.

“मी पार्लियामेंटमध्ये नडते तेव्हा मंत्र्यांना नाही नडत. नडायचं असेल तर अमित शहांना नडायचं नाही तर बाकीच्यांना कशाला खिजगणतीत घ्यायचं. त्या पक्षाचा अध्यक्ष आहे. टीका करायची तर अमित शाहांना करायची बाकीच्या मंत्र्यांवर कशाला..”

“आणि त्या मंत्र्यांचे केंद्रात काय हाल आहेत ना मला माहिती आहे. किती फायली कोणाकडे जातात ते आमचेच दोस्त लोक आहेत. ते आमच्याचकडे येऊन रडतात नंतर, पण आता काय आहे की, झाकली मुठ सव्वा लाखाची आणि खुली तर खाक की... त्यामुळे आपली दोस्ती एक तरफ आणि काम एक तरफ” असं सुळे यांनी म्हटलं.

Updated : 29 Feb 2020 6:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top