Home > रिपोर्ट > पाच वर्षांपासून देशात सूपर इमर्जन्सी - ममता बॅनर्जी

पाच वर्षांपासून देशात सूपर इमर्जन्सी - ममता बॅनर्जी

पाच वर्षांपासून देशात सूपर इमर्जन्सी - ममता बॅनर्जी
X

भारतात आजच्या दिवशी 44 वर्षापूर्वी 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित केली होती. या घटनेचे पडसाद ट्विटरवर उमटत आहेत. दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आणीबाणीच्या या घटनेवर ट्विट केलं आहे . या माध्यमातून ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ताशेरे ओढले आहेत.

देशात आजच्या दिवशी आणीबाणी घोषित केली होती मात्र गेल्या पाच वर्षांपासून देशात सूपर इमर्जन्सी लागू करण्यात आली आहे. लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी लढण्याची इच्छा हवी असं ममतांनी सांगितले आहे.

https://twitter.com/MamataOfficial/status/1143336759205306368

Updated : 25 Jun 2019 8:24 AM GMT
Next Story
Share it
Top