Home > रिपोर्ट > सुट्टीच्या दिवशी पंकजा मुंडे काय करतात

सुट्टीच्या दिवशी पंकजा मुंडे काय करतात

सुट्टीच्या दिवशी पंकजा मुंडे काय करतात
X

पंकजा मुंडेना निवांत वेळ मिळाल्यावर त्या काय करत असतील असा प्रश्न अनेकांना पडतो. राजकारणातल्या सतत आक्रमक असलेल्या पंकजा मुंडे सुट्टी मात्र एकदम परफेक्ट बायको आणि आई सारखी घालवतात. त्यांना आपल्या परिवारासोबत वेळ घालवायला आवडतो.

त्याचमुळे रविवारच्या दिवशी नेहमीचा राजकीय पेहराव सोडून त्या टी शर्ट, गॉगल घालून आपल्या परिवारासोबत जेवायला निघाल्या. जेवायला जाताना प्रघात म्हणून instagram वर मुला आणि नवऱ्यासोबतचा फोटो अपलोड करायला मात्र विसरल्या नाहीत.

तिकडे मात्र रविवार असूनही त्यांचे कार्यकर्ते पंकजा ताईंच्या पुढच्या राजकीय वाटचालीकडे डोळे लावून बसले आहेत. पंकजा मुंडे यांच्या फोटोखाली जय महाराष्ट्र अशी सूचक घोषणा लिहून कार्यकर्ते या पोस्ट व्हायरल करण्यात गुंग होते.

View this post on Instagram

Sunday lunch ..hubby me n my son.. #familytime #stressbuster❤️

A post shared by Pankaja Gopinath Munde (@pankaja_gopinath_munde) on

Updated : 8 Dec 2019 12:26 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top