'हम तो तेरे आशिक है...' सुधीर मुनगंटीवार
Max Woman | 4 Dec 2019 2:39 PM IST
X
X
महाराष्ट्रात राजकीय नाट्यात सुधीर मुनगंटीवार हे नाव चर्चेत होते. आता मात्र त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ राजकीय नसून सुधीर मुनगंटीवारांच्या मुलीच्या लग्नातील आहे. शलाका सुधीर मुनगंटीवार ही सुधीर मुनगंटीवार यांची कन्या हीचं 1 डिसेंबर रोजी लग्नसोहळा पार पडला. नागपूरच्या एम्प्रेस पॅलेस या ठिकाणी झालेल्या या लग्न सोहळयात संगीत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सुधीर मुनगंटीवार आणि त्यांची पत्नी सपना मुगंटीवार यांचा एक डान्स परफॉर्मन्स झाला. 'छोड दो आचल जमाना क्या कहेगा...', 'हम तो तेरे आशिक है....'; 'हम साथ साथ है... ' या तीन गाण्यांवर सुधीर मुनगंटीवार आणि त्यांची पत्नी सपना मुनगंटीवार यांनी डान्स केला.
https://youtu.be/hN2C_N8aMeQ
Updated : 4 Dec 2019 2:39 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire