अशी होतेय कौमार्य चाचणी…
X
आजवर आपण मोठ-मोठ्या राजकर्त्यांच्या मुला-मुलींची लग्न पाहिलीत. मात्र या लग्नानंतर विवाहितेची कौमार्य चाचणी परिक्षणांची माहिती समोर आली का हो? किंवा राजकारणी मंडळी या कंजारभाट समाजातील क्रुप्रथेला साथ दिल्याची माहिती समोर आली का? नाहीना. परंतु पुण्याचे माजी नगरसेवक सुनिल मलके यांनी आपल्या मुलाच्या लग्नानंतर आपल्या सुनेची कौमार्य परीक्षा घेतली आहे. नुकतेच 30 डिसेंबर 2018 रोजी कंजारभाट समाजातील उद्योजक पुण्याचे माजी नगरसेवक सुनिल मलके यांनी आपल्या होणाऱ्या सुनेची कौमार्य परीक्षा घेतली. ज्यात जातपंचायतीने नवऱ्या मुलाला(कुणाल) मिळालेल्या मालाची म्हणजे नवविवाहितचे कौमार्य अबाधित असल्याची विचारणा तीनवेळा ‘समाधान’ शब्द उच्चारायला लावून केली.
आता बघा, एकविसाव्या शतकात विद्येच्या माहेरघरात ‘इंग्लड’वरून उच्च शिक्षण घेऊन आलेल्या वराने जातपंचायतीला शरण येत उच्च शिक्षण घेतलेल्या वधूची कौमार्य परीक्षा घेण्याला संमती दिली. वराचे वडील पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सुनील मलके तर वधूचे वडिल निवृत्त पोलिस अधिकारी आहेत. या प्रथेला कडाडून विरोध करणारे कंजारभाट समाजातील व राज्य सरकारमधील अधिकारी कृष्णा इंद्रेकर यांनी याला वाचा फोडली.
नेमकं काय घडलं या पंचायतीच्या बैठकीत पाहा हा Exclusive व्हिडिओ…