Home > रिपोर्ट > महिलांवरच्या अश्लील कमेंट थांबवा नाहीतर घरात घुसून ठोकून काढू - सक्षणा सलगर यांचा इशारा

महिलांवरच्या अश्लील कमेंट थांबवा नाहीतर घरात घुसून ठोकून काढू - सक्षणा सलगर यांचा इशारा

महिलांवरच्या अश्लील कमेंट थांबवा नाहीतर घरात घुसून ठोकून काढू - सक्षणा सलगर यांचा इशारा
X

मागच्या आठवड्यात ‘पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आक्षेपार्य फोटो फेसबुकवर शेअर केल्यामुळे भाजप कार्यकर्ती प्रियांका शर्मानां अटक करण्यात आली होती. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह कॉमेंट टाकल्यामुळे नवा वाद निर्माण झाला. दरम्यान याबाबत पुणे शहरात खडसाळ पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेस यांनी तक्रार नोंदवली होती. याची दखल घेत सायबर क्राईम तपास करून कोल्हापूर जिल्ह्यातील चावरे येथील हा युवक असल्याचे समजले.

यानंतर राष्ट्रवादी युवक विद्यार्थी काँग्रेसमार्फत त्याला चोप दिला आणि जाहीर माफी मागायला भाग पाडले दरम्यान याबाबत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या सदस्या सक्षणा सलगर यांनी मॅक्स वुमनशी सवांद साधला असता त्या म्हणाल्या " वेळोवेळी अश्या आक्षेपार्ह कॉमेंट बद्दल तक्रार नोंदवली जाते मात्र त्यावर पोलिस काहिही कारवाई करत नाही, मुळात अश्या प्रकारच्या कॉमेंट देशातील कोणत्याच महिलेबद्दल करणं चुकीचं आहे, अश्या लोकांना कायद्याची भाषा कळत नसून दणका आणि हिसका द्यावा लागतो. राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असावं . त्यामुळे यापुढे अश्या कॉमेंट करणाऱ्या सोशल मीडिया यूजर्सना गर्भित इशारा आहे, जर हे थांबलं नाहीतर घरात घुसून ठोकून काढू असा इशारा त्यांनी दिला आहे".

Updated : 18 May 2019 10:58 AM GMT
Next Story
Share it
Top