Home > रिपोर्ट > आदिवासी समाजातली पहिली UPSC उत्तीर्ण होणारी श्रीधना  

आदिवासी समाजातली पहिली UPSC उत्तीर्ण होणारी श्रीधना  

आदिवासी समाजातली पहिली UPSC उत्तीर्ण होणारी श्रीधना  
X

आदिवासी भागातील मुलांना शिक्षण जरी घेता आलं असलं तरी UPSCच्या परिक्षेत उत्तीर्ण होऊन उंच भरारी घेणारी पहिली मुलगी म्हणजे केरळमधली २२ वर्षीय श्रीधना सुरेश.... हिने युपीएससी परिक्षेत उत्तीर्ण होऊन आपल्या समाजाचे नाव रोशन केलं आहे. विशेष म्हणजे तिच्या या यशाची दखल खुद्द काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतली असून त्यांनी तिला अभिनंदनाच्या शुभेच्छा देणारं ट्विट करुन तिच्या मेहनत आणि प्रामाणिकपणाची प्रशंसा केली आहे.

अमेठी या पारंपारिक मतदारसंघाबरोबच राहुल गांधी यांनी वायनाडमधूनही लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. श्रीधना त्यांच्याच मतदारसंघातील युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणारी पहिली आदिवासी महिला ठरली आहे. तिचे अभिनंदन करताना राहुल गांधी ट्विटरवर म्हणतात,‘ श्रीधनाने घेतलेल्या प्रचंड मेहनतीचे आणि प्रामाणिकपणाचे हे फळ आहे. त्यामुळेच ती तिचे स्वप्न सत्यात उतरवू शकली. तिने जे करिअर निवडले आहे, त्यासाठी मी तिचे आणि तिच्या कुटुंबियांचे आभार मानतो.’ श्रीधना ही २२ वर्षांची असून तिने युपीएससीत ४१० क्रमांक मिळविला आहे.

https://twitter.com/RahulGandhi/status/1114355974167519233

दरम्यान, केरळमधील सर्वात मोठ्या आदिवासी समाजापैकी मी एक आहे. आतापर्यंत कोणत्याही आदिवासी विद्यार्थ्याने युपीएससीच यश मिळविले नव्हते. मला विश्वास आहे की माझे हे यश समाजातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. असं श्रीधना सुरेश हिने म्हटलं आहे.

Updated : 6 April 2019 11:54 AM GMT
Next Story
Share it
Top