Home > रिपोर्ट > इंग्लंडची क्रिकेटपटू सारा टेलरचं विवस्त्र फोटोशूट

इंग्लंडची क्रिकेटपटू सारा टेलरचं विवस्त्र फोटोशूट

इंग्लंडची क्रिकेटपटू सारा टेलरचं विवस्त्र फोटोशूट
X

इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघातील यष्टीरक्षक खेळाडू सारा टेलर सध्या आपल्या यष्टीरक्षणामुळे नाही, तर इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे चर्चेत आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विजेच्या वेगाने यष्टीचीत करण्यासाठी सारा ओळखली जाते. तिने इन्स्टाग्रामवर विवस्त्र फोटो शेयर केले आहेत. womens health uk या महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थेसाठी सारा टेलरने हे फोटोशूट केलं आहे. सारानं दिलेल्या संदेशात म्हटलं आहे की, प्रत्येक मुलीला तिच्या शरिराचा अभिमान असायला हवा. जे लोक मला ओळखतात त्यांना माहिती आहे की हा माझा कम्फर्ट झोन नाही. तरीही मला अभिमान वाटत आहे की womenshealthuk च्या अभियानात मी सहभागी आहे. प्रत्येक मुलगी सुंदर दिसते आणि लक्षात ठेवा प्रत्येक महिला सुंदर असते असंही सारा म्हणाली.

https://www.instagram.com/p/B1HNPvCHGPv/?utm_source=ig_web_button_share_sheet

Updated : 16 Aug 2019 9:36 AM GMT
Next Story
Share it
Top