Home > रिपोर्ट > ...म्हणून सोनिया गांधी तिहार जेलमध्ये पोहोचल्या

...म्हणून सोनिया गांधी तिहार जेलमध्ये पोहोचल्या

...म्हणून सोनिया गांधी तिहार जेलमध्ये पोहोचल्या
X

आयएनएक्स मिडीया प्रकरणी गेल्या एक महिन्यापासून तिहार तुरूंगात अटकेत असलेले माजी गृहमंत्री आणि कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांची भेट घेण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी आज तिहार तुरूंगात चिदंबरम यांची भेट घेतली.

आयएनएक्स मिडीयात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी चिदंबरम यांच्यावर सीबीआय आणि ईडीने कारवाई केली होती. सुरूवातीला या घोटाळ्याप्रकरणी चिदंबरम यांचा दिल्ली उच्च न्यायलयाने अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र तेथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. याऊलट त्यांना न्यायालयीन कोठडी सुनवण्यात आली. ईडी आणि सीबीआयच्या जाळ्यात अडकलेल्या चिदंबरम यांना भेटीसाठी आज कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि मनमोहन सिंह आज तिहार तुरूंगात पोहोचले. यांच्या या भेटीवरून सोनिया गांधी, चिदंबरम यांच्या पाठीशी उभ्या असल्याचं दिसून येत आहे.

Updated : 23 Sep 2019 4:44 PM GMT
Next Story
Share it
Top