Home > रिपोर्ट > soniya gandhi यांचे अध्यक्षपद कायम

soniya gandhi यांचे अध्यक्षपद कायम

soniya gandhi यांचे अध्यक्षपद कायम
X

विधानसभा निवडणूकीत (maharashtra assembly election 2019 result) काँग्रेसने चांगली भूमिका बजावली आहे. त्यामुळे आता पक्षाची इच्छा असे पर्यंत सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदी (Soniya Gandhi, president of the Indian National Congress party) राहणार असल्याचं पक्षाचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या हाती पराभव आला. त्यामुळे राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर सोनिया गांधी यांच्याकडे हंगामी अध्यक्ष म्हणून सूत्रे सोपविण्यात आली होती. त्या वेळी 'ही तात्पुरती, कामचलाऊ व्यवस्था' असल्याचे काँग्रेसने म्हटले होते. मात्र, आता काँग्रेसची ही भूमिका बदलली असून पक्षाची इच्छा असेल तोपर्यंत सोनिया गांधीच अध्यक्षपदावर राहतील असे अँटनी पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.

Updated : 27 Oct 2019 9:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top