ऐका सोनाली बेंद्रेची कहाणी...
X
कँसरशी झुंज देत असलेल्या अनेकांसाठी आता सोनाली बेंद्रे मानसिक आधाराचं केंद्र बनलीय. गेल्या वर्षी जुलै महिन्यात सोनालीने तिच्या तब्येतीबाबत माहिती दिली होती. तिला कँसर असल्याचं तिने माध्यमांसमोर सांगितलं. ती सध्या अमेरिकेत उपचार घेत असून इन्स्टाग्राम वरून ती तिच्या तब्येतीबाबत चाहत्यांना सतत अपडेटही ठेवत आहे. आता हार्परच्या बझार या मॅगझिनला तिने मुलाखत देऊन आपली सगळी कहाणीच लोकांसमोर आणलीय.
बझार च्या मुलाखतीबद्दल सोनाली बोलतेय की, मला माझ्या तब्येतीबद्दल शंका-कुशंका आणि सहानुभूती नकोय. मला जे सांगायचंय ते मांडण्याचा मी प्रयत्न केलाय. मला वाटतं माझ्या १२ वर्षाच्या मुलाने आणि परिवाराने त्यातील शब्दन् शब्द वाचावा. मी काही ठरवून केलं नाही, पण मला चांगला प्रतिसाद येतोय.
आजारपणाच्या काळात मी रडले, वेदना सहन केल्या, स्वतःची कीव आली.. मी यातून गेले. फक्त तुम्हालाच माहित असतं काय वेदना तुम्हाला सहन कराव्या लागतात. पण हे स्वीकारून तुम्हाला पुढे जावं लागतं. या भावना, दुःख वाईट नाहीयत. पण प्रत्येक वेळी त्या भावना ओळखून त्यांना तुमच्या आयुष्याचा ताबा घेण्यापासून रोखलं पाहिजे. असं सोनालीने या मुलाखतीत म्हटलं आहे. सोनालीने तिची कहाणी सांगण्यासाठी #switchonthesunlight हा हॅशटॅग ही वापरलाय.
https://www.instagram.com/p/Bvy8FDVhrmX/?utm_source=ig_share_sheet&igshid=16po0csiyt9sl