Home > रिपोर्ट > सोलापुरात राष्ट्रवादी विरोधात मतदान करणे पडले महागात

सोलापुरात राष्ट्रवादी विरोधात मतदान करणे पडले महागात

सोलापुरात राष्ट्रवादी विरोधात मतदान करणे पडले महागात
X

सोलापूर जिल्हा परिषेदतील मोहिते -पाटील गटाच्या राष्ट्रवादीच्या सहा सदस्याचे निलंबन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेमध्ये भाजपला साथ दिल्यामुळे ही कारवाई केल्याची समजते. ही कारवाई राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी केली आहे. यामध्ये स्वरुपाराणी मोहिते पाटील, शीतल देवी मोहिते पाटील, अरुण तोडकर, सुनंदा फुले, गणेश पाटील, मंगल वाघमोडे या सहा राष्ट्रवादीच्या सदस्यांचे निलंबन करण्यात आले आहे. उमेश पाटील यांनी सभागृहात पक्षादेश वाचून दाखवला असता हा आदेश झुगारून भाजप आघाडीला पाठिंबा दिला. या पाठिंब्यामुळे भाजप विजय झाला. याआधी विधानसभेच्या निवडणुकीत मोहिते पाटील यांनी भाजपच्या राम सातपुते यांना पाठिंबा दिला होता.

Updated : 12 Jan 2020 8:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top