Home > Max Woman Blog > समाज आणि व्यसन

समाज आणि व्यसन

समाज आणि व्यसन
X

दारू म्हटलं की,दारूड्या ,न नांदणारी बायको, लेकरांची उपासमार भग्न कुटुंब घरातील निस्तेज म्हतारे आईवडील असं चित्र ग्रामीण भागात 20वर्षापूर्वी नव्हते दिसत गावात एखादा हातभट्टी दारू विकणारा व तुरळीक तालुक्याच्या ठिकाणी बाजारच्या गावात एखादं देशीचं दुकान असायचे.म्हणजे दारुची दाहकता भयानकता एवढी जानवत नसे कष्टाने थकलेल्या शरीराला जरा आराम मिळावा हा हेतु या दारुपिण्यामागे पिणार्या लोकांचा होता.

(सरकारचा नाही)पण आज दारूची एवढी भयानकता का वाढत आहे का ही तिव्र समस्या जानवत आहे याबद्दल जेव्हा जेव्हा जाणुन समजून घेतले अभ्यास केला तेव्हा तसेच जेव्हा आमच्या समुपदेशन केंद्रात पिडीत महिला आणि हो पुरुष पण येतात दारूच्या व्यसनाची समस्या पिडीत महिला सांगत असतात प्रत्येक स्त्रियाच्या घरात मग ते सासर माहेर दोन्ही ठिकाणी प्रत्येक पुरुष दारूच्या आहारी गेलेला असल्याचे महिलांकडून कळते या दारूमुळे दुहेरी कौटुंबिक हिंसाचाराचा महिलांना लहान मुलांना सामना करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणावर दारूच्या व्यसनामुळे एकल विधवा परित्यक्ता महिलांंची संख्या वाढताना दिसत आहे.

मराठवाड्यात तर महिला दारुड्या नवर्याला सोडून MNT(मी नवर्याला टाकले)तसेच MMS (मी माहेर सोडले ) माहेर सोडून स्वतंत्र रहातात.परंतु बर्याच महिलांना माहेर आणि सासर कडून आर्थिक पाठबळ,संपत्ती मधील वाटा मिळत नसल्याने त्यांना फुलटाईम करत करत पार्टटाइम वेश्याव्यवसाय पण करावे लागत आहेत.कौटुंबिक हिंसाचार याचा जर विचार केला तर महिलांना शुद्र म्हणुन दलित म्हणून दुय्यम स्थान म्हणुन त्रास तर सहन करावेच लागतात यामागे जसे पुरुषप्रधानता ही पित्रसत्ताक व्यवस्थेने निर्माण केलेली दिर्घकालीन कारणे आहेत तसेच #दारुहे _तात्कालिकहिंसाचाराचं कारण आहे जे की,दिर्घकालीन होत आहे असं मला वाटतं.दारूबंदी का व कशासाठी :जागतिक आरोग्य संघटना दारु पिणार्या व्यक्तीला जर मानसिक आजारी असं म्हणत असेल तर मग महाराष्ट्र सरकार हे दारूधार्जिणं धोरण अवलंबत समाजातील तरुणांना पुरुषांना दारू पाजुन आजारी का करत आहे?आज बाप आणि मुलगा,सासरा आणि जावयी एकाच दुकानावर एकाच ग्लासने दारू पितात. मराठवाड्यात महिलांची मजुरी ऊसतोडणीची आर्धी ऊचल(महिलेची)महिलांना हाणमार करत दारूवर उडवतात.यामुळे घरातील कुटंबावर उपासमारीची वेळ येते. कुटुंबातील मुलींचे बालविवाह मोठ्या प्रमाणावर होत आहेत. बीड जिल्ह्यातील महिलांचे गर्भाशय काढण्याचे जे भयानक प्रकार घडले या प्रकरणाची चौकशी करणारी अभ्यास समिती बीडमध्ये येऊन गेली तेव्हा खुप सार्या महिलांनी घरातील पुरुष दारूडे असल्याचे कारण ईतर कारणांपैकी एक आणि महत्वाचे कारण सांगितले.

यामध्ये महिला अंगावर दुखने काढतात (घरातील या दारू संकटामुळे)जे पुरुष कमालीचं दारूचं व्यसन करतात त्यांची लैंगिक क्षमता कमी होते त्यामुळे स्त्रियांच्या चारित्र्यावर संशय घेणे त्यांना उपासी ठेवणे त्यांचा खुन करणे यासारखे हिंसाचार दारूडे करतात.तरुणपणातच दारूचे व्यसन जडल्याने विचार करण्याची क्षमता कमी होते नोकरी व्यावसाय यावर दारूचा परिणाम होतो.ज्या मोठमोठ्या अ दर्जाच्या ग्रामपंचायती आहेत त्या अंतर्गत आम्हाला आढळून आले आहे की,दारूड्या तरूण मुलांची लग्ने होत नाहीत."मुलगी आडात ढकलून द्यावी पण दारुड्याला देऊ नये"असे उद्गगार महिलांच्या तोंडून ऐकले आहेत.

घरातील दारूडे स्त्रियांवर हिंसाचार करताना क्रुर पद्धतीने करतात.लवुळ माजलगाव तालुक्यातील गावात एका महिलेला तिच्या नवर्याने दारू प्यायला का पैसे देत नाही म्हणुन विजेच्या कंरटच्या शेगडीवर डोक्यावर उलटे टांगुन उभा केले होते त्यात तिचे डोक्यावरचे केस जळाले होते. खतगव्हाण या गावात एका दारूड्यानेमुलीची शिक्षणाची फी न भरता मला दारू प्यायला का पैसे दिले नाही म्हणून घरातील सर्व दरवाजांच्या खिडक्यांच्या कुंड्याना करंट लावून कुटुंबातील सर्व माणसांना रात्रभर घराबाहेर बसवून ठेवलं होतं किट्टी आडगाव या गावातील महिलेने विहीरीत उडी मारली होती का तर, म्हणे उसतोडीचीअर्धी उचल दारूची ऊधारी फेडायला का देत नाही म्हणुन तिला लाकडाने हाणमार केली. अंबेजोगाई येथील एक विटभट्टी कामगाराने चार महिन्याच्या बांळतिन बायकोचा खून केला रात्रभर आईचं म्रत शरीरावर एक मुलगी झोळीत होती. संबंधित बाळास नातेवाईकांनी सांभाळण्यास नकार दिल्याने आम्ही शिशुग्रहात पाठवले.चूलीवरचे मटण विकणारे कोंबडीचे बडदे पिल्ले खिशात घालुन दारूडे दारूविक्रेत्यांना विकतात.नुकतीच सरकारने अंगणवाडीतील मुलांसाठी राशन योजना सुरू केली यात तांदूळ मुगाची डाळ तेल असं दिल जातं ते सुद्धा वडवणी तालुक्यातील कवडगाव या गावातील तरुण विकत असल्याचे बायकोला सांगितले. सादोळा या गावातील 20एकर शेती असणारा शेतकरी देशोधडीला लागला. बायकोने कंटाळून जाळून घेऊन आत्महत्या केली त्याने स्वतः ही गळफास घेऊन आत्महत्या केली.मुलगा नातेवाईकाकडे तर मुली अनाथाश्रमातील शाळेत शिकायला गेल्या.माजलगाव शहरात एका दारूड्या ने लेकरांसमोर बायकोचा खून करून तिचे अर्धे शरीर फ्रीज मध्ये ठेवलेतर अर्धे पाण्याच्या ड्रम मध्ये.हैदराबाद मध्ये झालेला डाँक्टर रेड्डी या तरुणीचा बलात्कार आणि खून हा दारूतुन झाला.निर्भया कोपर्डी हे बलात्कार आणि खूनिची प्रकरणे दारुतुन झालेली आहेत.

#व्यहनमुक्तीकार्यक्रमांनाआलेले अपयश:महाराष्ट्रात दारुच्या संदर्भाने अनेक लोक वैयक्तिक संस्थात्मक पातळीवर अनेक वर्षांपासुन काम करतात यात अनिल अवचट यांचे मुक्तांगण अंधश्रद्धा निर्मुलन समिती चे काही केंद्रे सोडली तर या व्ययसनमुक्ती कार्यक्रमांना सरळसरळ अपयश आल्याचे जानवते.व्यसनमुक्ती च्या कार्यक्रमांना सरकारचे मिळणारे अनुदान,सरकारचं दारुधार्जिणं धोरण याला कार्यकर्ते आणि व्यसनमुक्ती वर काम करणार्या सामाजिक संस्था बळी पडल्याचे दिसुन येते तसेच दारुमाफियांकडून दारूबंदीवर काम करणार्या कार्यकर्ते यांच्यावर होणारे हल्ले यामुळे दारूविरोधात काम करण्यासाठी सहसा कोणी पुढे येत नाही.व्यसनमुक्ती केंद्रातुन आम्हाला ही बाब जामवली की ,दारूड्यांना व्यसनमुक्ती केंद्रात उपचारासाठी टाकले तरी ते पुन्हा या व्यसनाकडे वळतात वरचेवर दारूड्यांचं प्रमाणवाढत असल्याने या संस्थांचे प्रयत्न पुरेसे ठरत नाहीत आता तर दारुड्या महिलांसाठी सुद्धा खास एक वेगळा विभाग सुरू करण्यात आला आहे.(मुक्तांगण पुणे)यामुळे व्यसनमुक्ती कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणावर भंपकपणा वाटतो (जनजाग्रती सोडली तर)

#अमंलबजावणीकरणारीयंत्रणानिष्क्रियआणि_भ्रष्ट दारुबंदी बाबत अमंलबजावणी करणारी यंत्रणा म्हणुन राज्य उत्पादन शुल्क विभाग,पोलीस प्रशासन हे दोन विभाग दारूशी संबधीत आहे .अवैध आणि हातभट्टी दारूबंदीसाठी पोलीस प्रशासन सर्वात आधी कार्यवाही(कायद्याचं संरक्षण करणारी यंत्रणा म्हणुन जबाबदार असते पण सध्या राज्य उत्पादन शुल्क अधिकारी परवाने वाटप करण्यावर शुल्क गोळा करणार्यांवर भर देत आहे. हे दोन्ही विभाग म्हणजे कायद्याची,योजनांची अमंलबजावणी करणार्या सरकारी यंत्रणा आहेत पण त्या कुचकामी डरत आहेत.कारण यात हप्तेखोरी हा सगळ्यात महत्वाचा फँक्टर आहे.यामुळे कायद्यांची अमंलबजावणी होत नाही. बीड जिल्ह्यात एकुन कमीतकमी 5280 हातभट्टी दारू विक्रेते असणे हाच मोठा पुरावा यात आहे.याचबरोबर महिलांनी हातभट्ट्या उध्वस्त केल्या तर हे हातभट्टी वाले याच महिलांना नुकसानभरपाई मागतात याचा अर्थ या अवैध दारू विक्रेत्यांना सगळ्या शासकीय,राजकीय यंत्रणांचे अभय आहे.

यामु दारूमाफियांमध्ये वाढ होताना दिसत आहे. तसेच काही अधिकारी र प्रामाणिक पणे कर्तव्य निभावायला गेले तर ज्यांच्या दारू कंपन्या आहेत असे राजकारणी लोक सत्तेचा वापर करुन बदलीची धमकी दिले देऊन या अधिकार्यांवर दबाव टाकुन त्यांना कर्तव्या करण्यापासून रोखलं जातं मराठवाड्यात पोलीस पाटीलांची रिक्त पदे,जे पोलीस पाटील आहेत ते दारूविक्रेत्यांकडून हप्ते घेऊन गप्प बसतात. सरपंच उपसरपंच यांचे नातेवाईक स्वतः अवैध हातभट्टी क्षदारू विकतात सरपंच महिला ज्या गावात असतात तिथे त्यांना प्रत्यक्ष कारभार करू दिला जित नाही.झोपडपट्टी दादा माँब लिंचिग राईट वाहन कायदा तडीपारीची कार्यवाही फार कमी लोकांवर केली जाते.

#संविधानातीलकलम_47आधारघेतदामिणीदारुबंदीअभियानचीकायदेशीरलढाई:भारतीय संविधानावर सर्व देशाचा कारभार चालतो. याच संविधानात कलम 47असं सांगतं की, राज्य पोषणमाण व राहणीमा उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य आहे मादक पेये व आरोग्यास हाणिकारक (अपायकारक) अशी अमंली द्रव्य यांचे औषधीय प्रयोजनाखेरीज सेवन करण्यांवर बंदी आणण्यासाठी प्रयत्नशील राहील.पण हे करावेच असं बंधन नाही. तरीसुद्धा व्यसनाच्या बाबतीत राज्य अधोगती कडे जाऊ नये आहे त्या स्थिती मध्ये ठेवणे हे अभिप्रेत आहे. आज जर बघीतले तर व्यसन हे फँशन आजार म्हणून अख्या तरुणाईला विळखा घालत आहे दारू बाबतीत कोणतेही कायदे असले,जीआर असले तरी ते संविधानापेक्षा मोठे नाहीत महिलांचा आणि इतर कोणत्याही व्यक्तीचा जिवीताचा हक्क,समानतेचा हक्क भयमुक्त जगण्याचा हक्क सरकार दारुविक्रेते हिराऊन घेऊ शखत नाहीत. नव्या वर्षाचे स्वागत करताना नव्या दारुड्यांची निर्मीती ही 31डिसेंबर पासुनच होते यामुळे तरुणांनी "दारुचा विळखा वेळीच ओळखा" थर्टी फस्ट हा दिवस नव्या दारूड्यांची निर्मीती करणारा नाही तर आपल्या आयुष्याची नवी सुरवात नवे संकल्प नवे निर्णय घेणारा आंनद वाटणारा ठरावा सर्वांना नव्या वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा

-सत्यभामा सौंदरमल

दामिणी दारुबंदी अभियान

Updated : 31 Dec 2019 7:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top