Home > पर्सनॅलिटी > विद्या बाळ : स्त्रियांच्या प्रश्नांसाठी आयुष्य वेचणाऱ्या नायिकेचा जीवन प्रवास

विद्या बाळ : स्त्रियांच्या प्रश्नांसाठी आयुष्य वेचणाऱ्या नायिकेचा जीवन प्रवास

विद्या बाळ : स्त्रियांच्या प्रश्नांसाठी आयुष्य वेचणाऱ्या नायिकेचा जीवन प्रवास
X

पुरुषांप्रमाणेच महिलांना त्यांच्या संधी मिळण्यासाठी उभं आयुष्य झगडणाऱ्या विद्या बाळ यांचं पुण्यात निधन झालं. स्त्रीयांच्या प्रश्नावर काम करणार विद्या बाळ ह्या एक चालतं बोलतं विद्यापीठच होत्या. स्त्रियांच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी विद्या ताईंनी नारी समता मंच, मिळून साऱ्या जणीं, अक्षरस्पर्श ग्रंथालय, साथ-साथ विवाह अभ्यास मंडळ, पुरुष उवाच अभ्यासवर्ग, पुरुष संवाद केंद्र या संस्था स्थापन केल्या. आणि त्या यशस्वीपणे चालवल्या देखील.

पुणे आकाशवाणीवर कार्यक्रम सादरकर्त्या म्हणून त्यांनी आपल्या पत्रकारीतेची सुरुवात केली. पुढे त्यांनी १९६४ ते १९८३ या काळात त्यांनी ‘स्त्री’ या मासिकाच्या साहाय्यक संपादक म्हणून आणि 1983 ते 1986 मध्ये त्यांनी संपादक म्हणून काम पाहिलं.

1989 मध्ये त्यांनी ‘मिळून साऱ्याजणी’ हे साप्ताहीक सुरु केलं. या साप्ताहिकाच्या संस्थापक संपादक होत्या. विद्या बाळ यांचं हे मासिक महाराष्ट्रातील प्रेरणास्थान ठरलं.

विद्या बाळ फक्त स्त्रियांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी संस्था स्थापन करुन थांबल्या नाहीत तर त्यांनी आपल्यातील लेखक जीवंत ठेवला. त्यांनी तेजस्विनी, वाळवंटातील वाट, जीवन हे असं आहे, रात्र अर्ध्या चंचाची तर कमलाकी (डॊ. कमलाबाई देशपांडे यांचे चरित्र) या साहित्याचं लेखन विद्या बाळ यांनी केलं. त्यांनी काही स्फुट लेखांचे संकलन देखील केलं.

अपराजितांचे निःश्वास (संपादित)

कथा गौरीची (सहलेखिका- गीताली वि.मं. आणि वंदना भागवत)

डॉटर्स ऑफ महाराष्ट्र

तुमच्या माझ्यासाठी,

मिळवतीची पोतडी (संपादित,सहसंपादिका मेधा राजहंस)

त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना समाजातील अनेक नामांकित संस्थांनी पुरस्कार देऊन गौरवन्वीत केलं. आगरकर पत्रकारिता पुरस्कार, कै. कमल प्रभाकर पाध्ये ट्रस्टचा पुरस्कार, कै. शंकरराव किर्लोस्कर पुरस्कार, सामाजिक कृतज्ञता निधीतर्फे देण्यात येणारा ‘सामाजिक कृतज्ञता जीवनगौरव पुरस्कार’, स्त्री-समस्यांविषयक कार्य व पत्रकारिता यांबद्दल फाय फाउंडेशनचा पुरस्कार.

या पुरस्कारानं त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. स्त्रियांना त्यांच्या हक्काची जाणीव करुन देणाऱ्या, स्त्रियांना न्याय मिळून देण्यासाठी उभं आयुष्य खर्च करणाऱ्या विद्याबाळ यांच्याकडून भावपुर्ण श्रद्धांजली...

Updated : 31 Jan 2020 1:46 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top