Home > रिपोर्ट > महिलांनो सोशल मीडियाचा वापर करताय तर हे वाचा

महिलांनो सोशल मीडियाचा वापर करताय तर हे वाचा

महिलांनो सोशल मीडियाचा वापर करताय तर हे वाचा
X

सोशल मीडियाच्या क्रेझपासून महिला काही दूर नाही. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम इ. वापर दररोज करत असतात. सोशल मीडियावर अनेक अनोळखी फ्रेंड्स भेटत असतात... आणि तुम्ही अगदी सहजरित्या कुणाशीही संवाद साधू शकता.मात्र हा संवाद साधत असताना तुम्ही कोणती सावधगिरी बाळगता... कारण तामिळनाडूतील सामुहिक बलात्काराचे प्रकरण पाहिले असता आपण सोशल मीडियावर सेफ आहोत ना असा प्रश्न अनेकांना पडला असेल. सोशल मीडिया मुळे आपण कुठेही, कुणाशीही संवाद, संपर्क करु शकतो मात्र याची काळी बाजू अशी की हे सगळ करत असताना कुणी आपल्याला फसवत तर नाही ना किंवा कुणी आपल्या मैत्रीचा गैरवापर तर करत नाहीना.. हा विचार आपण करायला हवा.

महिलांनी सोशल मीडियाचा वापर करताना ही सावधगिरी बाळगावी

- तुम्ही फेसबुकवर एखाद्याशी मैत्री करत असताना त्याची प्रोफाईल चेक करणे आवश्यक

- अनओळखी फ्रेंड्सशी गप्पा मारताना संवाद कुठल्या पद्धतीने सुरु आहे हे पाहा

- महिला, मुलींनी विश्वासू असलेल्या मित्र-मैत्रिणींशी संवाद साधा

- सोशल मीडियावरील तुमचं अकाऊंट कुणी हॅक तर करत नाही ना हे बघणे आवश्यक

- सोशल मीडियाच्या वापरामुळे तुमच्या आयुष्यात कुठलीही चुकीची घटना घडू नये यासाठी सावधगिरी बाळगा.

- सोशल मिडीयातील ओळखीतुन भेटतांना एकट्याने भेटु नका.

- कुठलीही शंका येताच घरच्यांशी मोकळेपणाने बोला.

Updated : 14 March 2019 10:07 AM GMT
Next Story
Share it
Top