Home > रिपोर्ट > ‘या’ महिलांसाठी मोदींनी घेतला सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय

‘या’ महिलांसाठी मोदींनी घेतला सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय

‘या’ महिलांसाठी मोदींनी घेतला सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सोशल मीडिया यांचं एक अतुट नातं आहे. मात्र काल रात्री मोदींनी सोशल मीडियाचा वापर थांबवण्याबाबत संकेत दिले होते. ‘या रविवारी मी ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब यावरील माझे सर्व अकाऊंट्स सोडण्याचा विचार करत आहे,’ असं ट्वीट नरेंद्र मोदी यांनी केलं आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

मोदींच्य़ा या ट्विटला मग नेटीझन्सनी फारच मनावर घेतलं आणि आपल्या प्रतिक्रीया देण्यास सुरुवात केली. काल रात्रीपासून सोशल मीडियावर मीम्सची जोरदार लाट उसळली आहे. या चर्चांना मोदींनी आता पुर्णविराम दिलाय. त्यांनी आपल्या ट्विटचा उलगडा केला असून त्यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्वांचं लक्ष वेधण्यासाठी ही शक्कल लढवली होती.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये “महिला दिन, मी माझे सोशल मीडिया अकांऊट्स अशा महिलांसाठी देईन ज्या इतरांना त्यांच्या आयुष्य आणि त्यांच्या कामतुन प्रेरीत करतील.” म्हटलं आहे.

Updated : 3 March 2020 8:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top