Fact Check : महिलांवर बलात्कार करा, असं खरंच राहुल गांधी म्हणाले का?
Max Woman | 13 Dec 2019 6:20 PM IST
X
X
भारतातील पुरूषांना काँग्रेसचे नेते तसंच लोकसभेचे सदस्य राहुल गांधी यांनी बलात्कार करा असा आदेश दिला आहे, आणि प्रत्येक महिलेला कलंकित करण्याचं पाप त्यांनी केलं असून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशा आशयाचं जोरदार आणि आक्रामक भाषण स्मृती इराणी यांनी लोकसभेत केलं आहे. हे भाषण तुम्ही ऐकलंच असेल. नसेल तर एकदा हे भाषण पाहूयात आणि सत्य पडताळणी करूयात...
‘पार्टी चा नेता भारतातील महिलांचा बलात्कार व्हायला पाहिजे. हे राष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा घडत आहे. कॉंग्रेस पार्टीचा नेता बलात्कारासारख्या मोठ्या गुन्हाचं राजकारणाचा भाग करत असेल. हे देशात पहिल्यांदाच घडत आहे. गांधी खानदानाचा एक मुलगा उघडपणे म्हणत आहे. भारतात बलात्कार करा. आज मी अध्यक्ष जी आपल्याला विचारु इच्छिते की, या सभागृहाचे नेते आहेत राहुल गांधी. या सभागृहाचे सदस्य आहेत. काय राहुल गांधींचं हे वक्तव्य आहे का? की, भारतातील प्रत्येक पुरुष महिलेचा बलात्कार करु इच्छितो. काय राहुल गांधी यांचं हे वक्तव्य देशातील जनतेला संदेश आहे, सावर्जनिक ठिकाणी आवाहन करत आहे. देशातील महिलांवर अत्याचार व्हायला पाहिजे.
आज फक्त या सभागृहाच्या महिला आणि पुरुष सदस्यांची ही बाब नाही. या सभागृहाचा एक सदस्य पहिल्यादांच अशी ही हिम्मत करत आहे. की, भारतातील महिलांच्या बाबत त्यांचा बलात्कार व्हायला पाहिजे असे शब्द त्यांच्या तोंडातून निघत आहे.
भारतातील एखाद्या महिलेला विचारा अध्यक्षजी... जर आवाहन केलं जात असेल तर अशा बलात्काराचं तर त्यांना सडेतोड उत्तर देता येतं. अध्यक्षजी मी संरक्षण मागते. गांधी घराण्याच्या खासदाराने महिलांवर अत्याचार करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांना दंडित केलं पाहिजे. काय आपण त्यांना दंडीत करणार का? या देशातील प्रत्येक भाऊ, वडील बलात्कारी नाही. जो बलात्कारी आहे. त्याला या देशातील कायदा शिक्षा देतो. मात्र, जो अशा पद्धतीने आवाहन करतो. त्यांना निश्चितपणे दंडीत केलं पाहिजे.’
असं म्हणत राहुल गांधी यांच्या शिक्षेची मागणी केली.
https://youtu.be/gpM-BCpLJNY
त्यानंतर काहीच वेळात राहुल गांधी यांच्यावर स्मृती इराणी कशा भारी पडल्या, आणि राहुल गांधी कसे व्हिलन आहेत असं दाखवणाऱ्या पोस्ट आय़टी सेल कडून व्हायरल झाल्या. त्यात राहुल गांधींचं झारखंड मधलं भाषण वापरण्यात आलं आहे.
आता राहुल गांधी यांनी खरंच बलात्कार करा असं सांगितलं होतं का, राहुल गांधी यांनी महिलांना कलंकित केलं आहे का हे पाहुयात. राहुल गांधी नेमकं काय बोलले होते. रेप इन इंडिया या वाक्याच्या आसपास राहुल गांधी यांनी केलेलं वक्तव्य असलेला हा व्हिडीयो ही पाहा
‘भारत देश जगात बलात्काराची राजधानी म्हणून ओळखला जातो. परदेशी राष्ट्रं प्रश्न विचारत आहेत की भारत आपल्या मुली आणि बहिणींचा सांभाळ करण्यात सक्षम का ठरत नाही? उत्तर प्रदेशातील एका भाजपच्या आमदाराने एका महिलेवर बलात्कार केला आणि पंतप्रधान एक शब्दही बोलत नाहीत.’
‘आता जिकडे बघाल, तिथे रेप इन इंडिया. वर्तमानपत्र उघडा, झारखंडमध्ये महिलेवर बलात्कार, उत्तर प्रदेशात नरेंद्र मोदींच्या आमदाराने महिलेवर रेप केला. त्यानंतर गाडीचा अपघात झाला, नरेंद्र मोदी एक शब्दही नाही बोलले. प्रत्येक राज्यात रेप इन इंडिया. नरेंद्र मोदी म्हणाले मुली शिकवा, मुली वाचवा, पण तुम्ही हे नाही सांगितलंत की कोणापासून वाचवायचं आहे. भाजपच्या आमदारांपासून वाचवायचं आहे’
राहुल गांधी यांचं भाषण ऐकल्यावर त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यातर्फे झालेल्या बलात्कार आणि पिडीतेला जीवे मारण्याच्या घटनेचा संदर्भ दिला असून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या तावडीतून महिलांना वाचवण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचं वक्तव्य योग्य संदर्भ न देता लोकसभेच्या सभागृहात आक्रमक भाषण केल्याचं स्पष्ट झालं आहे.
Updated : 13 Dec 2019 6:20 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire