Home > रिपोर्ट > स्मृती इराणींनी घेतला भिडे गुरूजींचे आशीर्वाद

स्मृती इराणींनी घेतला भिडे गुरूजींचे आशीर्वाद

स्मृती इराणींनी घेतला भिडे गुरूजींचे आशीर्वाद
X

केंद्रीय बालकल्याण मंत्री स्मृती इराणी या सांगली मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारासाठी आल्या होत्या. प्रचारसभा आटोपल्यानंतर स्मृती इराणी यांनी शिवप्रतिष्ठाचे संस्थापक संभाजी भिडे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतला.

दरम्यान इराणी म्हणाल्या की, “संभाजी भिडे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरूवर्य आहेत. दोघांनी संघात एकत्र काम केले. शिवप्रतिष्ठांच्या माध्यमातून भिडे मोठं मोलाचं काम करत आहेत. त्यामुळे मी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आले आहे.”

तसेच संभाजी भिडे यांनी स्मृती इराणी यांना राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त पाचाडला रायगडाच्या पायथ्याशी येण्याचे निमंत्रण देखील दिले आहे.

Updated : 15 Oct 2019 1:41 PM GMT
Next Story
Share it
Top