Home > रिपोर्ट > गानसम्राज्ञी लता मंगेशकर रुग्णालयात दाखल

गानसम्राज्ञी लता मंगेशकर रुग्णालयात दाखल

गानसम्राज्ञी लता मंगेशकर रुग्णालयात दाखल
X

आपल्या मधुर आवाजाने अनेक संगीत प्रेमींच्या मनात आपले अधिराज्य गाजवणाऱ्या (Lata Mangeshkar)लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली आहे. गानकोकीळा लता मंगेशकर यांना जंतुसंसर्गाचा त्रास झाल्याने रविवारी त्यांना घराजवळच्या ब्रिच कँडी या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अनेक चाहत्यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली परंतु सध्या त्यांची प्रकृती सुधारत असून आज त्यांना डिस्चार्ज मिळेल अशी माहिती लता मंगेशकर यांची भाची रत्ना शहांनी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे लतादीदींचे चाहते सुखावले आहेत.

Updated : 12 Nov 2019 11:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top