Home > रिपोर्ट > श्रेया घोषाल का संतापल्या...

श्रेया घोषाल का संतापल्या...

श्रेया घोषाल का संतापल्या...
X

चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषालने नुकताच ट्विटवरती सिंगापूर एअरलाइन्स विरोधात संताप व्यक्त केला. सिंगापूर एअरलाइन्सने विमानातून संगीत वाद्य नेण्यास मनाई केल्याने श्रेयाने असं ट्विट केले आहे.

"संगीतकार किंवा मौल्यवान वस्तू असलेल्या कोणत्याही व्यक्तीने सिंगापूर एअरलाइनमधून प्रवास करू नये, असे सिंगापूर एअरलाइन्सला वाटत असावे असे दिसतेय. धन्यवाद!’

असं ट्विट श्रेया घोषालने केलं आहे. या ट्विटनंतर सिंगापूर एअरलाइन्सने आपल्या ट्विटर हॅण्डलवरून तिची जाहीर माफीही मागितली आहे. मात्र त्यावर श्रेया ने अजूनही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Updated : 18 May 2019 11:45 AM IST
Next Story
Share it
Top