Home > रिपोर्ट > चाळीशीतला श्रावण...

चाळीशीतला श्रावण...

चाळीशीतला श्रावण...
X

थोडंसं भावनिक

श्रावण झुल्यावर

मन हिंदोळ्यावर

श्रावण आला की आठवतो आमचा श्रावण सोहळा, अनेक शो, अनेक स्पर्धा, असंख्य मैत्रिणी मजा, सहभाग उत्साह natta पट्टा, आणि मस्त एन्जॉय.

काही वर्षे तर अगदी पंख लावल्यासारखी भरकन उडून गेली.इकडे मुलं मोठी होत होती तशी काही करण्याची उर्मी स्वस्थ बसू देत नव्हती. महिला मंच साठी काम करताना आणि अशाच इव्हेंट्स मध्ये सहभागी होताना किंवा ते host करताना खूप शिकायला मिळाले .

ते दिवसही तसे होते. चाळिशीकडे वाटचाल असावी बहुतेक म्हणून ही.... घाई झालेली असायची .मैत्रिणींचा उत्साह गप्पातून उगाच वाटायचं अरे आपलं संपत आलं का सगळं,? अजून खूप हौस मौज राहिलीय आणि मन कसंनुस व्हायचं. मग त्या भरभर तयाऱ्या ती धावपळ ते मिरवण्याची हौस आणि आपण काहीतरी मस्त करतोय हा आनंद ओसंडून वाहायचा, (कॉलेज सोडून लग्न होऊन अनेक वर्षे उलटलेली असतात आपण फक्त आपल्या मुलांच्या gatharing साठी किंवा असेच फॅमिली पुरते नाच गाण्यात सहभागी होत असतो)आणि तो क्षण येतो, जेंव्हा आपण स्टेजवर आणि आपल्या समोर हजारो प्रेक्षक, मैत्रिणी आणि आपला परफॉर्मन्स ....मस्त सुखावून जायचो. धडधड काही कमी नसायची तेंव्हा, !!पोटात गोळे यायचे चालताना आणि चेहरा घामेघुम तरी मस्त हसू आणून आपण धाडसाने पाऊल टाकायचो.

हे सगळं या फोटोत एकवटून आलंय आणि मला पुन्हा त्या स्टेज वर घेऊन गेलंय मन.

अचानक ,अरे !!!!किती गडबड केली होती आपण हे आठवून हसूही आलंय.

अजूनही वेळ गेलेली नाही, मीही आहे वेळही आहे फक्त बदलले आहेत ते संकल्प, बदलले आहेत त्या घटना, त्या दिवसातले क्षण ,बदलले आहे कॅलेंडर च्या तारखा बदलल्या आहेत त्या मॉडेल्स सहभागी पात्र,मीही तर बदलत चाललीय थोडी जाडी झालीय नाही का!

मी मी म्हणून खूप जगायला शिकले ,कधी मिरवत कधी मागे उभे राहून प्रोम्पटिंग करत कधी सूत्रसंचालन तर कधी भन्नाट नाचगाणी, मी मला शोधत गेले तशी सापडत गेले, मी मला माझ्यात आणलं आणि माझ्यात भिनलेली माझी माणस, थोडीशी एका मागच्या कप्प्यात ठेवली तशी मी आत कुठंतरी रुतून पाठी बसलेली सरकत वाट काढत पुढे पुढे आले.

‎मला मी गवसले म्हणायला ,मी ही होते ,अशी आहे !,हे मान्य करावं लागतं तर तुमचं असं गवसण तुम्हाला आवडतं.अस कधीतरी आपलं अस्तिव शोधताना आपल्याला नकळत झालेल्या जखमा सुद्धा आता भरून आलेल्या असतात.

‎पाऊल जसजसे अडखळत सरावाने सवयीचे गुळगुळीत होत जाते तसे अनेक आनंदीक्षण तुमच्या दुखऱ्या जखमांना मलम म्हणून धावत येतात. अशा सुंदर आठवणीतील हा पैठणी रॅम्प walk त्यावर दिसणारे नाचरे मोर उलगडून दाखवताना भारी वाटायचं आणि ही सगळी तयारी walk शिकता आलं ते अनेक इव्हेंट्स चे मार्गदर्शक ज्यांनी खूप छान तयारी करून घेतली होती .

‎बरेचदा महिलांना संकोच वाटतो की आपल्याला कसे जमेल किंवा कोण काय म्हणेल पण या गोष्टी आता असे विचार अनेक टीव्ही शो मुळे मागे पडले. प्रेरणा घेण्यासाठी अनेक चॅनल आणि माहिती मिळत असते. पूर्वी तसे नसायचे ,कोणीतरी ओळखीचे असल्याशिवाय सहभागी होणे खूप अवघड असायचे.

‎मी तर महिलांना त्यांच्याशी काम करताना अनेकदा आनंदाने रडताना पाहिले आहे. कितीदा तरी त्यांना अनेक स्पर्धेत भाग घेण्यास घरचे विरोध करतात तर कधी सपोर्ट असतो. कारणं अनेक असतील पण स्त्री म्हणून विचार केला तर तिच्या कलागुणांना वाव देणारा समाज ,कुटुंब असेल तर नक्कीच तिला आनंद मिळतो. आणि हे मिळवण्यासाठी महिलांनी एकदा तरी छानसे सहभागी होऊन आपला आनंद स्वतःच मिळवायला शिकल पाहिजे.

‎श्रावण महिना हा सण वर्तवैकल्या साठी असला तरी तो स्त्रियांना सुखद अलहादादायी रिमझिम पावसात उधाण वाऱ्यासवे श्रुंगार रसात भिजवणारा असतो.अशा अनेक स्पर्धा कार्यक्रम आणि त्यातील सहभागातून स्त्रियांचा आत्मविश्वास वाढत जातो. हे लिहताना सुद्धा अनेक सुंदर आठवणींचा अल्बम माझ्या स्मृतिपटलावर उमटत चालला आहे.

,तेंव्हा....असं काही ,असं वयाला न जुमानता सहभागी होताना मुलांच्या चिडवण्याला न घाबरता आपण असे काही रॅम्प वॉक करू शकतो हे कोणत्याही महिलेसाठी फार आनंददायी क्षण असतो नाही का!

अशाच एका कार्यक्रमात मी अशी मध्यभागी आलेली आणि नजर शिकवल्या प्रमाणे समोरच्या कॅमेरा कडे रोखलेली आणि दुसऱ्याच फोटोग्राफर चा हा क्लीक माझ्या आठवणीत गुंफत गेला.

‎सुखावत गेला श्रावण हा असा

‎मानामनाच्या आठवणी जश्या

‎कधी नटणे मुरडणे आवडते हिला

‎कधी रणरागिणी चे रूप खुणावते तिला

‎श्रावण आला श्रावण आला

‎सुखद क्षणांची झालर लेऊन

‎सुखावण्या या सखीला!!

-वृषाली वजरीनकर

Updated : 1 Aug 2019 11:58 AM GMT
Next Story
Share it
Top