Home > रिपोर्ट > सरड्यालाही लाज वाटवी एवढे रंग मनसेने बदलले- मनिषा कायंदे

सरड्यालाही लाज वाटवी एवढे रंग मनसेने बदलले- मनिषा कायंदे

सरड्यालाही लाज वाटवी एवढे रंग मनसेने बदलले- मनिषा कायंदे
X

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे सरचिटणीस संदिप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी आज सकाळी शिवसेनेबद्दल एक ट्विट केलं. ट्वीटमध्ये देशपांडेंनी शिवसेनेवर “लोकसभेत सीएए (CAA)आणि एनआरसीला (NRC) पाठिंबा, राज्यसभेत विरोध, पुन्हा मोदींना भेटल्यानंतर पाठिंबा, वाघ आहे का बेडुक...” असा टोला लगावला. या ट्वीटमुळे मनसे (MNS) आणि शिवसेनेत (Shivsena) पुन्हा जुंपली आहे.

यावर शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी संदिप देशपांडे यांच्या ट्वीटला प्रतिउत्तर दिलं आहे. “मनसेने गेल्या १४ वर्षात अनेक रंग बदलले आहेत. सरड्यालादेखील लाज वाटावी एवढे रंग त्यांनी बदलले आहेत.” असं म्हटलय.

शिवसेनेने आपली भुमिका कधी बदलली नाही. कधी तळ्यात कधी मळ्यात अशा बेडकाच्या उड्या मनसेच इतकी वर्ष मारत आहे. हे जनता पाहत आहे. म्हणून त्यांच्या भाषणाला किती गर्दी झाली तरी मतात त्यांचं रुपांतर होत नाही. याचं कारण काय असावं ते त्यांनी शोधावं असा सल्ला कायंदे यांनी यावेळी दिला.

Updated : 22 Feb 2020 10:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top