Home > रिपोर्ट > पंकजा मुंडेंच्या शिवसेना प्रवेशावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या "वेट अँड वॉच"

पंकजा मुंडेंच्या शिवसेना प्रवेशावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या "वेट अँड वॉच"

पंकजा मुंडेंच्या शिवसेना प्रवेशावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या  वेट अँड वॉच
X

राज्याच्या राजकारणात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा आहे. पंकजा मुंडे लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी भाष्य केलं आहे. 'पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्या कुटुंबासोबत आमचे राजकारणापलीकडचे नाते आहे. मुंडे कुटुंबासोबत वेगळा संवाद आहे. पंकजा यांच्याविरोधात शिवसेनेनं उमेदवारही दिला नव्हता. 12 डिसेंबरला अजून नऊ दिवस बाकी आहेत. तोपर्यंत वेट अँड वॉच,' असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे.

Updated : 3 Dec 2019 9:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top