Home > रिपोर्ट > ‘तिने’ सचिन तेंडूलकर यांचा ३० वर्ष जुना रेकॉर्ड तोडला

‘तिने’ सचिन तेंडूलकर यांचा ३० वर्ष जुना रेकॉर्ड तोडला

‘तिने’ सचिन तेंडूलकर यांचा ३० वर्ष जुना रेकॉर्ड तोडला
X

हरयाणात राहणाऱ्या १५ वर्षीय शेफाली वर्मा ही अंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक पार करणारी भारताची सर्वात लहान खेळाडू ठरली आहे. शेफालीने क्रिकेटपट्टू सचिन तेंडूलकर यांचा ३० वर्षे जुना रेकॉर्ड तोडला आहे.

सुरतमध्ये रंगलेला हा आंतरराष्ट्रीय सामाना अतिशय रंगदार ठरला. शेफाली ने दक्षिण आफ्रिकेविरोधात पहिल्या टी-२० सामन्यात ४९ बॉल मध्ये ७३ रण केले आहेत. आपल्या पाचव्या टी-२० मॅच यादरम्यान तिने सहा चौकार आणि चार षटकार मारले आहेत.

१६ वर्षाचे असताना सचिन तेंडूलकर यांनी अर्धशतक रेकॉर्ड आपल्या नावी केला होता. मात्र, अवघ्या १५ व्या वर्षी हा रेकॉर्ड आपल्या नावे करुन शेफाली ने तेंडूकरांचा रेकॉर्ड तोडून त्यांना मागे टाकले आहे.

Updated : 10 Nov 2019 1:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top