Home > रिपोर्ट > शक्ति मिल सामुहिक बलात्कार प्रकरण; आरोपींना फाशीच!

शक्ति मिल सामुहिक बलात्कार प्रकरण; आरोपींना फाशीच!

शक्ति मिल सामुहिक बलात्कार प्रकरण; आरोपींना फाशीच!
X

मुंबईतील शक्ति मिल सामुहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे. यावेळी आरोपींना सुनावलेली शिक्षा ही कायद्याचा चौकटीत बसणारी असल्याचं देखील न्यायालयानं म्हटलंय. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयानं राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. शक्ति मिल सामुहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींनी 376 कलमातील सुधारणेला आव्हान दिलं होतं. पण, हे आव्हान न्यायालयानं फेटाळून लावलं आहे. त्यामुळे आरोपींना सुनावलेली फाशीची शिक्षा निश्चित करण्यासाठीच्या सुनावणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

काय आहे प्रकरण?

22 ऑगस्ट 2013 रोजी मुंबईतील शक्ति मिल येथे महिला छायाचित्रकारावर सात जणांकडून सामुहिक बलात्कार करण्यात आला होता. अटक केलेल्यांमध्ये एक जण अल्पवयीन आरोपी होता. सुनावणीदरम्यान न्यायालयानं आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती.

Updated : 4 Jun 2019 1:38 PM IST
Next Story
Share it
Top