वीरपत्नी कनिका कौस्तुभ राणे... सलाम..!
Max Woman | 1 Aug 2019 5:14 PM IST
X
X
शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना जाऊन अजून वर्षही झालं नाही. येत्या ७ ऑगस्टला त्या घटनेला एक वर्ष होईल. पतीच्या निधनाला एक वर्ष होण्याआधीच त्याच्या अकाली निघून जाण्याच्या धक्क्यातून, दुःखातून स्वतःला सावरत, एका छोट्या मुलाचा सांभाळ करत शहीद मेजर राणे यांच्या पत्नी कनिका राणे यांनी मिलेट्रीत जाण्याचा निर्णय घेतला.
शिवाय वर्षभरातच त्यासाठी हवी असणारी सर्व पूर्वतयारी केली. अपेक्षित परीक्षा दिल्या. आणि कालच अशी बातमी आली की, मिलेट्रीत भरती होण्यासाठी कनिका राणे यांनी दिलेल्या परीक्षेत त्या अव्वल क्रमांकाने उत्तीर्णही झाल्या. शिवाय लवकरच पुढच्या ट्रेनिंगसाठी चेन्नई येथेही जाणार आहेत.
एक पती म्हणून कनिका राणे यांच्या जगण्याचा खंबीर आधार असणाऱ्या शहीद मेजर राणे यांच्या अकाली निघून जाण्यानंतर स्वतःला सावरणं.... त्यातही पुन्हा स्वतः मिलेक्ट्रीत जाण्याचा निर्णय घेणं... त्यासाठी आवश्यक त्या परीक्षांची तयारी करणं... त्यातही अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण होणं... व पुन्हा भरती होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वर्षभराच्या ट्रेनिंगसाठी चेन्नई येथे जायला सज्ज होणं हे कनिका राणे यांनी घेतलेले सर्व निर्णय हे त्यांच्या अजोड ध्येयवादाची साक्ष देणारे आहेत.
"जिथे कुंकवाने रक्त सांडले, तिथेच नव्या जोशाने कर्तृत्वाचा झेंडा रोवणे यापेक्षा श्रेष्ठ अशी श्रध्दांजली ती कोणती असेल
वीरपत्नी कनिका राणे, आपल्या त्यागाला, संघर्षाला आणि ध्येयवादाला आमचा #सलाम...
Updated : 1 Aug 2019 5:14 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire