Home > रिपोर्ट > अभिनेत्री शबाना आझमी कार अपघातात जखमी

अभिनेत्री शबाना आझमी कार अपघातात जखमी

अभिनेत्री शबाना आझमी कार अपघातात जखमी
X

प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या कारला मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर पुण्याकडे जाताना अपघात झालाय. या अपघातात शबाना आझमी यांच्या तोंडाला आणि पायाला जबर जखम झालीये. पण जावेद अख्तर यांना कोणतीही इजा झालेली नाही. खालापूर टोल नाक्याजवळ पुढे जाणाऱ्या ट्रकला त्यांच्या टाटा सफारी गाडीने मागून जोरदार धडक दिली. जखमी शबाना आझमी यांना एमजीएम रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. शबाना आझमी आणि जावेद अख्तर मुंबईहून पुण्याकडे निघाले होते. पण खालापूर टोलनाक्याजवळ त्यांच्या कारने मागून एका ट्रकला जोरदार धडक दिलीय. त्यांना उपचारासाठी तातडीने एम.जी.एम रुग्णालय कळंबोली येथे नेण्यात आले आहे. शबाना आझमी यांना भेटण्यासाठी सिनेसृष्टीतील अनेकांनी हॉस्पिटलकडे धाव घेतलीये.

Updated : 18 Jan 2020 12:28 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top