Home > रिपोर्ट > मोदींना शुभेच्छा देऊनही शबाना आझमी ट्रोल

मोदींना शुभेच्छा देऊनही शबाना आझमी ट्रोल

मोदींना शुभेच्छा देऊनही शबाना आझमी ट्रोल
X

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने दमदार विजय मिळवला आहे. भाजपने ही निवडणूक राष्ट्रवाद, हिंदुत्व आणि गरिबांसाठीच्या योजना या मुद्द्यांवर लढवली. सर्वच स्तरांतून मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी देखील मोदींना विजयाच्या शुभेच्छा दिल्या .

मात्र या शुभेच्छांमुळेच त्यांना ट्रोलिंचा सामना करावा लागला. ‘देशाच्या जनतेने पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला शुभेच्छा,’ असं ट्विट त्यांनी केले आहे. दरम्यान या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका करायला सुरवात केली. राजकारणावर आपली मते स्पष्टपणे मांडण्यासाठी शबाना आझमी ओळखल्या जातात.

https://twitter.com/AzmiShabana/status/1131549417461313536

https://twitter.com/AzmiShabana/status/1131549417461313536

Updated : 24 May 2019 6:49 AM GMT
Next Story
Share it
Top