Home > रिपोर्ट > #मालेगाव - धार्मिक स्थळ पण मुलींसाठी असुरक्षितच

#मालेगाव - धार्मिक स्थळ पण मुलींसाठी असुरक्षितच

#मालेगाव - धार्मिक स्थळ पण मुलींसाठी असुरक्षितच
X

#मालेगाव शहरातील दरेगाव शिवारातील एका मुलींच्या मदरशात दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यासंदर्भात मदरशाच्या व्यवस्थापकासह तिघांना अटक करून दोन महिलांचा यामध्ये समावेश आहे. पीडित मुलगी ही मुंबईमधील मालाड येथील असून गरिबीमुळे आईने तिला शिक्षणासाठी मदरशात पाठवले होते. पाच महिन्यापूर्वी पीडित मुलगी धार्मिक शिक्षणासाठी मदरशात आली होती.

दरम्यान पीडित मुलीला घरातील स्वछतेसाठी बोलवून तिला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. घटना घडल्यानंतर मुलीने थेट पोलीस स्टेशन गाठत घडलेल्या प्रकारची माहिती दिली. संबधीत आरोपीना न्यायालयात दाखल करून पाच जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Updated : 3 July 2019 7:11 AM GMT
Next Story
Share it
Top