Home > रिपोर्ट > ज्येष्ठ पत्रकार मंगला विंचुर्णे-बर्दापूरकर यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार मंगला विंचुर्णे-बर्दापूरकर यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार मंगला विंचुर्णे-बर्दापूरकर यांचे निधन
X

औरंगाबाद : ज्येष्ठ पत्रकार मंगला विंचुर्णे-बर्दापूरकर यांचे दीर्घ आजाराने वयाच्या ६६व्या वर्षी निधन झाले. मुळच्या नागपूरच्या असलेल्या मंगला विंचुर्णे-बर्दापूरकर १९८० आणि ९० या दोन दशकातील मराठीतील अग्रगण्य महिला पत्रकार होत्या ; गेल्या पांच वर्षांपासून त्या औरंगाबादला स्थायिक होत्या . नागपूर पत्रिका या दैनिकाच्या रविवार पुरवणी आणि याच दैनिकाच्या महाराष्ट्र आवृत्तीचे संपादकपद त्यानी सांभाळले होते . १९८३ ते १९९० या काळात 'लोकसत्ता'च्या नागपूर येथील वार्ताहर म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे.

मंगला विंचुर्णे-बर्दापूरकर यांनी विविध वृत्तपत्रे , नियतकालिके आणि आकाशवाणीसाठी विपुल लेखन केलेले आहे . गेल्या चार वर्षापासून त्या पक्षाघात आणि असाध्य पार्किन्सनने आजारी होत्या . मंगला विंचुर्णे-बर्दापूरकर यांच्या पश्चात पती , ज्येष्ठ संपादक प्रवीण बर्दापूरकर , विवाहित कन्या सायली , जावई दीपक ग्यानानी , भाऊ श्रीकांत आणि खूप मोठा मित्र परिवार आहे . मंगला बर्दापूरकर यांच्या पार्थिवावर उद्या , ७ मार्चला सकाळी ९ वाजता प्रतापनगर स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात येतील .

Updated : 6 March 2020 10:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top