Home > रिपोर्ट > सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कागदावरील विद्यार्थ्यांचा लाखोंचा भ्रष्टाचार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कागदावरील विद्यार्थ्यांचा लाखोंचा भ्रष्टाचार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कागदावरील विद्यार्थ्यांचा लाखोंचा भ्रष्टाचार
X

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी कमवा व शिका’ ही योजना राबविली गेली . या योजणे अंतर्गत विद्यार्थ्यांना ३ ते ४ तास काम उपलब्ध करुन दिले जाते .त्यांना त्या कामाचे ४५ तास रूपये मानधन दिले जाते तसेच साडेतीन ते चार हजार रूपये विद्यार्थ्यांना त्यातून मिळतात व विद्यार्थी त्यातून त्यांचा सर्व खर्च भागवतात . दीड हजार विद्यार्थी विद्यापीठातील रेकॉर्डनुसार या योजनेत कार्यरत असून त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये दरमहा वेतन जमा होते . पंरतू प्रत्यक्षात काही अकाऊंट बोगस विद्यार्थ्यांच्या नावाने तयार केल्याचे समोर आले आहे . विद्यापीठाचे विद्यार्थी ‘कमवा व शिका या योजनेत कार्यरत नसताना ही काही व्यक्तींच्या नावे गेली असता दोन-तीन वर्षे वेतन जमा होत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

Updated : 14 May 2019 8:49 AM GMT
Next Story
Share it
Top