Home > Max Woman Blog > स्त्री‍शिक्षणाच्या अग्रदूत आणि स्त्री स्वातंत्र्यांच्या प्रणेत्या सावित्रीबाई-अदिती सावंत

स्त्री‍शिक्षणाच्या अग्रदूत आणि स्त्री स्वातंत्र्यांच्या प्रणेत्या सावित्रीबाई-अदिती सावंत

स्त्री‍शिक्षणाच्या अग्रदूत आणि स्त्री स्वातंत्र्यांच्या प्रणेत्या सावित्रीबाई-अदिती सावंत
X

स्त्री‍शिक्षणाच्या अग्रदूत आणि स्त्री स्वातंत्र्यांच्या प्रणेत्या सावित्रीबाई यांची ३ जानेवारी २०२० रोजी १८९ वी जयंती. स्त्री शिक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे योगदान मोठे आहे. स्त्री उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा ज्योतिराव फुले यांनी हाती घेतलेल्या समाजोद्धाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणाऱ्या सावित्रीबाईं. १७१ वर्षांपूर्वी स्त्रियांच्या शिक्षणासाठी समाजाचा विरोध सहन करीत, त्यांनी शेणा दगडाचा मारा सहन केला पण त्या मागे हटल्या नाहीत. त्यामुळे आपली सर्वांची प्रशस्त वाट तयार झाली.

आजकालची पिढी सावित्रीबाई चे योगदान विसरत चालली असल्यामुळे शिक्षणाचा गुरुमंत्र देणाऱ्या सावित्रीबाई च्या कार्याचा प्रसार आणि प्रचाराचे नेक काम जे राष्ट्र सेवा दल, मुंबई करत आहे, त्या बद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला यथोचित सन्मान मिळायला हवा. म्हणून ३ जानेवारी हा दिवस मी सणा सारखा साजरा करणार आहे. दारात रांगोळी, दरवाज्याला फुलांचे तोरण आणि उंबरठ्यावर ज्ञानाचे प्रतीक म्हणून एक पणती लावणार आहे आणि ऑफिसला जाताना कपाळावर सावित्री बाई जशा कुंकू लावायच्या तशी चिरी मी लावून त्यांच्या परी कृतज्ञता व्यक्त करणार आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८९ व्या जयंती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!

- अदिती सावंत

चार्टर्ड अकाउंटंट

Updated : 1 Jan 2020 1:34 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top