Home > रिपोर्ट > बहिण प्रियासाठी मुन्नाबाई प्रचाराच्या मैदानात

बहिण प्रियासाठी मुन्नाबाई प्रचाराच्या मैदानात

बहिण प्रियासाठी मुन्नाबाई प्रचाराच्या मैदानात
X

उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेस लोकसभा उमेदवार प्रिया दत्त यांच्या प्रचारासाठी खुद्द भाऊ संजय दत्त उतरला आहे. प्रिया यांची लढत भाजप खासदार आणि उमेदवार पूनम महाजन यांच्याविरोधात आहे. तसेच प्रिया दत्त या 10 वर्ष खासदार होत्या मात्र 2014च्या निवडणुकांत पूनम महाजन यांनी त्यांचा पराभव केला होता. पुन्हा एकदा प्रिया दत्त त्यांच्या विरोधात उभ्या आहेत. यंदा प्रिया बाजी मारणार का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थितीत होत आहे. अभिनेता संजय दत्त यांच्या प्रचारामुळे प्रिया यांना किती फायदा होणारेय हे तर निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल. प्रचार रॅलीवेळी जनतेतून एक आवाज येत होता... आप आगे बढो हम तुम्हारे साथ है.

पाहा हा व्हिडिओ....

https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/1187262511446892/

Updated : 23 April 2019 4:01 AM GMT
Next Story
Share it
Top