'जन औषधी केंद्रां' मध्ये मिळणार एक रुपयात सॅनिटरी नॅपकिन
Max Woman | 27 Aug 2019 2:09 PM IST
X
X
महिलांच्या स्वछतेसाठी सरकारने आणखी एक पाऊल उचलून आता सॅनिटरी नॅपकिन एक रुपयात उपलब्ध होणार आहे, ही माहिती रसायने आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली आहे. सरकारी 'जन औषधी केंद्रां'मध्ये आजपासून सॅनिटरी नॅपकिन एक रुपयात मिळणार आहे. सध्याची किंमत अडीच रुपये आहे. याचबरोबर आधी चार नॅपकिनचे १० रुपयांना मिळणारे पाकिट आता चार रुपयांना मिळणार आहे. सॅनिटरी नॅपकिनचे दर कमी करण्याचे आश्वासन सरकारने लोकसभा निवडणुकीदरम्यान दिले होते. ते आता पूर्ण झाल्याचे मांडवी बोलले.
Updated : 27 Aug 2019 2:09 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire