Home > रिपोर्ट > सानिया मिर्झा फिटनेसमुळे आली पुन्हा एकदा चर्चेत!

सानिया मिर्झा फिटनेसमुळे आली पुन्हा एकदा चर्चेत!

सानिया मिर्झा फिटनेसमुळे आली पुन्हा एकदा चर्चेत!
X

सानिया मिर्झा टेनिस कोर्टवर पुन्हा एकदा कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. प्रेग्नंसीच्या दरम्यान सानियाचं वजन ८९ किलोपर्यंत वाढलं होतं. वजन कमी करण्यासाठी तिने डिलिव्हरीच्या १५ दिवसांनंतरच एक्सरसाइझ करणं सुरू केलं व ८९ किलो वजन ६७ किलोपर्यंत कमी केलं. आता ती टेनिस कोर्टवर पुन्हा एकदा कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी ती तिच्या फिटनेसवर विशेष मेहनत घेत आहे. स्वतःला पुन्हा एकदा परफेक्ट शेपमध्ये आणण्यासाठी आणि खेळाच्या फिटनेससाठी सानिया रोज जोरदार प्रॅक्टिस करत आहे. सानियाने वयाच्या सहाव्या वर्षीपासून टेनिस खेळण्यास सुरवात केली.

सानियाने २००३ मध्ये व्यावसायिक टेनिस मध्ये प्रवेश केला. याच वर्षी तिने विम्बल्डनची ज्युनियर स्पर्धा अलिसा क्लेबनोव्हाच्या साथीने दुहेरीत जिंकली. विम्बल्डनची ज्युनियर स्पर्धा व ज्युनियर ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे. २००५ मध्ये हैदराबाद ओपन एकेरी स्पर्धा जिंकून डब्ल्यू. टी. ए. एकेरी स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला बनली.

२००५ च्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत वाइल्ड कार्डने प्रवेश करणार्याी सानियाने तिसर्याओ फेरीपर्यंत मजल मारली. तिसर्याक फेरीत प्रवेश करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. चौथ्या फेरीत तिला सेरेना विल्यम्सकडून पराभव पत्करावा लागला, मात्र त्यांनतर ती जगभर प्रसिद्ध झाली.नुकताच तिच्या ट्रेनरनं तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे.मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात सानियानं एका मुलाला जन्म दिला होता. तिनं मुलाच्या जन्मानंतर अवघ्या पाच महिन्यात तब्बल २२ किलो वजन कमी केलं होतं.स्वतःच्या फिटनेससाठी सानिया रोज ४ तास व्यायाम करते. यात १०० मिनिटं कार्डियो, १ तास किक-बॉक्सिंग आणि योगा याचा समावेश आहे.

https://www.instagram.com/p/BwC04-bnUiz/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/Bui6Becn2ol/?utm_source=ig_web_copy_link

Updated : 11 Jun 2019 7:34 AM GMT
Next Story
Share it
Top