घरात आलेल्या चोरावर महिला क्रिकेटपटूची वाघिणीसारखी झडप
X
विदर्भ क्रिकेट असोसीएशनची महिला क्रिकेटपटू सलोनी अलोट आपल्या मैदानाबाहेरील कामगिरीमुळे चर्चेत आली आहे. यष्ट्यांमागे चेंडूवर चपळाईने झडप घालणारी सलोनी आता आपल्या घरात आलेल्या चोरावर झडप घालून त्याला हतबल करुन सोडणारी म्हणुन ओळखली जातेय. ज्या बुद्धिमत्ता आणि चपळाईने ती क्रिकेट खेळते त्याच धाडसाने तिने चोरट्याला देखील पकडून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं.
नागपूरच्या स्वामी कॉलनीत राहणारी सलोनी आपल्या आईवडीलांसह शनिवारी रात्री साडेनऊच्या आपल्या मामाकडे एका कार्यक्रमासाठी गेली होती. कार्यक्रम आटोपून रविवारी मध्यरात्री दिडच्या सुमारास ती घरी परतली. सलोनी कार ‘पार्क' करीत असताना अचानक अंधारात फुलांच्या झुडपात काहीतरी हालचाल झाल्याचे दिसून आले. ती जवळ गेली असता चोरी करण्यासाठी आलेला भामटा तिथे दिसला. सलोनीला बघताच घाबरलेल्या चोरट्याने ‘वॉल कंपाऊंड'वरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र धाडसी सलोनीने लगेच पाठलाग करुन चोरट्यावर वाघिणीसारखी झडप घेतली आणि जवळपास दहा मिनिटे या दोघांमध्ये झटापट झाली. सलोनीच्या आईवडिलांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारी जमा झाले. यानंतर चोरट्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/617819349016003/