Home > रिपोर्ट > सलमान खानने घेतलं कोल्हापुरातलं पुरबाधित गाव दत्तक

सलमान खानने घेतलं कोल्हापुरातलं पुरबाधित गाव दत्तक

सलमान खानने घेतलं कोल्हापुरातलं पुरबाधित गाव दत्तक
X

चित्रपट सृष्टीतील दबंग स्टार सलमान खान (Salman Khan) अनेक कलाकारांचा गोडफादर म्हणूनही परिचीत आहे. तसेच त्याच्या दानी वृत्तीमुळेही तो सर्वांचा आवडता अभिनेता आहे. नुत्याच झालेल्या कोल्हापुरच्या महापुरात (Kolhapur Flood) अनेकांचे संसार वाहुन गेले, ते संसार अजूनही उभे राहू शकलेले नाहीत. असंच एक पुरबाधित खिद्रापुर गाव (Khidrapur) सलमान खानने दत्तक घेतलं आहे. पुरबाधित क्षेत्रांमध्ये सलमान खान आणि ऐलान फाउंडेशन मिळून पीडित कुटुंबांना निवारा मिळवून देण्यासाठी काम करणार आहे. खिद्रापुर या गावाचा तो कायापालट करणार आहे. त्याच्या या दर्यादिलीमुळे चाहते नक्कीच खुप खुश होतील.

Updated : 28 Feb 2020 7:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top