Home > रिपोर्ट > केंद्रीय संरक्षण समितीमधून प्रज्ञा ठाकूर यांची हकालपट्टी

केंद्रीय संरक्षण समितीमधून प्रज्ञा ठाकूर यांची हकालपट्टी

केंद्रीय संरक्षण समितीमधून प्रज्ञा ठाकूर यांची हकालपट्टी
X

भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहिल्या आहेत.काही दिवसापूर्वी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीत खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा देखील समावेश होता. लोकसभेत नथुराम गोडसे देशभक्त असल्याचा उच्चार केल्यामुळे भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांची संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीमधून हकालपट्टी करण्याचा निर्णय भाजपचे कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांनी घेतला आहे. भाजपाचे संसदेमधील कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रज्ञा ठाकूर यांचे वक्तव्य बरोबर नसून हे विधान निंदनीय आहे असं मत जेपी नड्डा यांनी नोंदवलं. या निर्णयामुळे समितीच्या कोणत्याच बैठकीला प्रज्ञा यांना उपस्थित राहता येणार नाही.

Updated : 28 Nov 2019 7:54 AM GMT
Next Story
Share it
Top