‘आता पक्षशिस्त पाळणार’, ‘त्या’ विधानाबद्दल प्रज्ञा ठाकूर यांचं पक्षाच्या नोटीशाला उत्तर
Max Woman | 5 Jun 2019 4:54 PM IST
X
X
भोपाळच्या भाजपच्या नवनिर्वाचित खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर पक्षाकडे खुलासा सादर केलाय. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी नथुराम गोडसे हा देशभक्त असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावर पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी ठाकूर यांना नोटीस पाठवत खुलासा मागिलता होता. त्याला आता ठाकूर यांनी हे उत्तर दिलंय.
पक्ष संघटनेत शिस्त असली पाहिजे आणि आपण आता पक्षशिस्त पाळणार असल्याचं प्रज्ञा ठाकूर यांनी आपल्या उत्तरात म्हटलंय. यापुढे आपलं सगळं काम हे पक्षशिस्तीला अनुसरुनच असेल असा विश्वासही त्यांनी पक्षश्रेष्ठींना दिलाय. भोपाळमध्ये असलेल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं देखील प्रज्ञा सिंह यांनी म्हटलंय. याशिवाय संधी मिळाली तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटाण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केलीय.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चांगल्याच चर्चेत आल्या होत्या.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा देशभक्त होता, असा दावा त्यांनी केला होता. यावरुन गदारोळ झाल्यानंतर त्यांनी माफीही मागितली होती.
Updated : 5 Jun 2019 4:54 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire