Home > रिपोर्ट > सावित्रीबाई स्त्री शिक्षणाचं वटवृक्ष-रेणुका कड

सावित्रीबाई स्त्री शिक्षणाचं वटवृक्ष-रेणुका कड

सावित्रीबाई स्त्री शिक्षणाचं वटवृक्ष-रेणुका कड
X

आज तुझा जन्म दिवस.... तू क्रांती जोती आहेस.... माय सावित्री आहेस... तुला साऊ म्हटलं ना की, तू खूप आपलीशी वाटते... तुझ्याशी बोलतांना कुठले किंतु परंतु मनात येत नाही... म्हणून प्रिय साऊस... साऊ, काही दिवसापूर्वी मी भंवरी देवीला भेटले होते. अगं पुण्यातच भेटले होते... जिथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू झाली होती... मी भंवरी देवीला भेटले त्या क्षणापासून आजपर्यंत माझ्या मनात विचार घुटमळतोय... भंवरीदेवीने तिच्या सोबत झालेल्या अन्याच्या दिवशीची रात्र कशी काढली असेल? तिचा जोडीदार तिच्यासोबत होता... काय काय विचार आले असतील त्याच्या मनात .... मनातलं हे कोलाहल सुरूच होत.. ते पुन्हा प्रियंका रेड्डीच्या बलात्कार आणि खुनाची बातमी आली. साऊ खर सांगू ही घटना ऑनलाइन वाचली तेव्हा पासून एकदाही यासंबंधात एकही बातमी पहावी वाटतं नाही... टीव्हीवर बातम्या लावाव्या वाटतं नाही... परत इतक भयानक कृत्य पाहायची हिंमत नाही गं. साऊ तु शिकून समाजातील इतर मुलींना शिकवाव म्हणून बा जोतिबा पुढे आला. तूही तुझ्या अंगावर येणार्‍या घाणीची, शेणाची, दगड गोट्याची पर्वा न करता स्वत: शिकून मुलींसाठी शिक्षणाची दार उघडून दिलीस.

साऊ तू आणि बा जोतिबाने स्त्री शिक्षणाचं रोप वटवृक्ष होतोय... मुली शिक्षणासाठी बाहेर पडत आहेत... सगळ्याच नाही गं शिकू शकत बोटावर मोजण्या इतक्या शिकून पुढंं येत आहे. त्यांनाही लढाव लागत आहे. त्या शिकून जीवनाचा संघर्ष करू पाहत आहे, त्यांना माणूस म्हणवणारे ‘पुरुष’ जगू देत नाहीये... अशा घटना जेव्हा जेव्हा घडतात तेव्हा तेव्हा सगळेजण आपआपल्यापरीने त्याचे तर्क वितर्क काढतात... मुलींसाठी संरक्षणाचे धडे नव्याने गिरवले जातात.. मोर्चे काढले जातात... आपला आक्रोश व्यक्त करण्यासाठी. यंत्रणेला जागे करण्यासाठी हे गरजेचे आहे... पण साऊ... तू आणि बा जोतिबा असते तर मुलांसाठी नक्कीच मानवतेचे धडे देणारे वर्ग सुरू केले असते... त्यांना मर्द... पुरुष... पितृसत्ता.. ह्या पोकळ गैरसमजुतीतून बाहेर येण्यास प्रयत्न केले असते.... साऊ ‘मूल मोठे होतांना’ मुलांसाठी उपक्रम सुरू केलाय... मुलांमध्ये मर्द असण्याची भावना खूप प्रखर आहे... ही भावना त्यांचही नुकसान करते हे त्यांना लक्षात येत नाही... साऊ ! खरतर ह्या पितृसत्तेने त्यांच नुकसानच केल आहे. पुरुष हा स्ट्रॉंगचं असला पाहिजे यामुळे तर सगळे प्रश्न निर्माण होतात... तो स्ट्रॉंग आहे हे सिद्ध कशाने करायचे तर ‘बाई’ला आपल्या ताब्यात घेऊन... तिने नकार दिला... प्रतिकार केला...चुकीला चूक म्हटलं की तिची निर्भया..प्रियंका...भंवरीदेवी...अरुणा शानबाग करायची... अगदी एखादी निर्जवी वस्तु तोडून मोडून टाकावी अशी तिची अवस्था करून ठेवायची... साऊ, किती भयानक आहे हे सगळं.

तू शिक्षणाची दार मुलींसाठी उघडी केलीस... मुली शिकल्या... शिकत आहे... पण इथल्या पितृसत्तेच्या पगड्याने इथल्या पुरुषाला शाळेत गिरवलेले स्त्री-पुरुष समानतेचे धडे आत्मसात नाही करता आले...किंबहुना मला तर वाटतं ही समाज व्यवस्था त्याला तसे करू देत नाही... समाजाचे अलिखित नियम आहेत .... बाईने आणि पुरुषाने कसे वागले पाहिजे याचे....

तुला शिकवण्याचा जोतिबानी निर्णय घेतला त्यावेळी बाईने शिक्षण घेणे हे जस थोडंड आहे हे बोलले जात होते ... नीती भ्रष्ट झाली हे बोलले जात होते...असच काहीसं चित्र आजही आहे.... साऊ तुझ्या लाखो लेकी शिक्षणाच्या वाटेवर आहेत.... पण त्याच्या वाट्याला जन्मदाता म्हणून... जीवनाचा जोडीदार म्हणून...भाऊ म्हणून...सखा म्हणून बा जोतिबा फारसे नाही दिसतं...

-रेणुका कड

Updated : 1 Jan 2020 12:51 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top