रुपाली पाटील यांच्या दणक्याचा धाक
X
मनसेच्या आक्रमक नेत्या आणि मनसेच्या माजी नगरसेविका रुपाली पाटील ठोंबरे यांनी एक फेसबुकवर पोस्ट केली आहे. यामध्ये पुण्यामधील महात्मा फुले मंडई शुक्रवार पेठ पुणे प्रभाग १५ येथे गेल्या अनेक दिवसापासून प्रशासनाने पाठ फिरवली असल्यामुळे या भागात गेल्या अनेक दिवसापासून येथील लाईट बंद आहे ,पाण्याच्या समस्या,छोट्या व्यपाऱ्यांचे गाळे सील केले जात आहेत.
याच्या बातम्यादेखील वृत्तपत्रात आल्या मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं.यासंदर्भात रुपाली ठोंबरे स्वतः या भागात जाऊन येथील नागरिकांची भेट घेतली. ही पोस्ट त्यांनी २-३ दिवसापूर्वी आपल्या फेसबुक वर पोस्ट करत "मनसे आता प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना दणका देणार" अशी पोस्ट केली. यानंतर लगेचच आज या भागात पाण्याची व्यवस्था करून नळ बसवण्यात आले.
यानंतर त्यांनी याचा फोटो फेसबुक वर पोस्ट करत "आमचं कसं तर असं काम म्हणजे कामच,आज नळ बसून पाणी आले.धन्यवाद बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल.अशी आमची कामाची पद्धत आहे बरं... " असं या पोस्टमध्ये म्हटले आहे. याआधी स्मृती इराणी यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केल्याप्रकरणी त्या चर्चेत होत्या .