Home > रिपोर्ट > "मुख्यमंत्र्यांच्या आडनाव बद्दल बोलण्याचा,अधिकार उरलेला नाही आपल्याला"

"मुख्यमंत्र्यांच्या आडनाव बद्दल बोलण्याचा,अधिकार उरलेला नाही आपल्याला"

मुख्यमंत्र्यांच्या आडनाव बद्दल बोलण्याचा,अधिकार उरलेला नाही आपल्याला
X

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. राजकीय वर्तुळात यावरून ट्विटवॉर सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी अमृता फडणवीसांवर निशाणा साधला आहे. त्यांनी अमृता फडणवीस यांच्या ट्विटला रिट्विट करून " गेल्या पाच वर्षांत, मुख्यमंत्री पत्नी म्हणून, आपण काय योगदान दिले महाराष्ट्रातील जनतेला,याचं थोडंतरी आत्मपरीक्षण करा आणि तसाही महाराष्ट्रातील जनतेने आपल्याला आणि आपल्या अहंकारी विचारांना नाकारले आहे.त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आडनाव बद्दल बोलण्याचा अधिकार उरलेला नाही आपल्याला" यालाच रूपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

https://twitter.com/ChakankarSpeaks/status/1209080765301919744?s=20

अमृता फडणवीसांवर निशाणा साधत त्यांना सल्ला देखील रूपाली चाकणकर यांनी दिला आहे. "अमृताताई, खरं तर पराभवामुळे आलेल्या वैफल्यग्रस्त मानसिकतेतुन आता आपण स्वतः सावरून, माजी मुख्यमंत्र्यांना देखील मानसिक आधार द्यायला हवा होता,पण साराचं अंधार दिसतोय आपल्या विचारात " अशी सल्लादायक टीका रूपाली चाकणकर यांनी अमृता फडणवीसांवर केली आहे.

https://twitter.com/ChakankarSpeaks/status/1209080767239737346?s=20

Updated : 24 Dec 2019 7:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top